न्यायालयात आता ‘माय लॉर्ड’, ‘युअर ऑनर’ हे ऐकायला मिळणार नाही, तर…

ओडिशा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डाॅक्टर मुरलीधर आणि न्यायमूर्ती आर.के. पटनायक यांच्या खंडपीठाने वकिलांना आवाहन केले आहे की, त्यांनी कृपया ‘माय लॉर्ड’, ‘युवर लॉर्डशिप’, ‘युअर ऑनर’ किंवा ‘ऑनरेबल’ असे संबोधणे टाळावे.

म्हणून असे संबोधणे थांबवावे

न्यायालयाच्या सभ्यतेनुसार संबोधण्यासाठी सर वा यासह इतर उपसर्गांचा वापर करण्याची विनंती न्यायमूर्तींनी वकिलांना केली आहे. यापूर्वी 2009 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात असताना न्यायमूर्ती मूरलीधर यांनी ‘युवर लाॅर्डशिप’ संबोधू नये असे वकिलांना सूचित केले होते. न्यायाधीशांना ‘मायलॉर्ड’ किंवा ‘युवर लाॅर्डशिप’ म्हटल्याने भारतात इंग्रजांच्या वसाहत काळाची झलक दिसून येते, असे बार काउंसिल ऑफ इंडियाने 2006 रोजी म्हटले होते.

बोबडेंनीही केली होती मागणी 

तसेच, कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी कृष्णा भट यांनी गेल्या वर्षी एक नोट जारी करून वकिलांना ‘माय लॉर्ड’ किंवा ‘युवर लॉर्डशिप’ असे संबोधणे टाळण्याचे आवाहन केले होते. तसेच, सरन्यायाधीश एसए बोबडे यांनी एका याचिकाकर्त्याला सुनावले की, “जेव्हा तुम्ही आम्हाला तुमचा सन्मान म्हणता, तेव्हा तुमच्या मनात एकतर युनायटेड स्टेट्सचे सर्वोच्च न्यायालय असते किंवा मॅजिस्ट्रेट असते. आम्ही दोन्हीही नाहीत.” त्यामुळे आम्हाला या विशेषणांनी संबोधणे थांबवावे.

( हेही वाचा :जशास तसे! भारतीय जवानांचे चीनला चोख प्रत्युत्तर )

याआधी केली होती मागणी 

2020 मध्ये कोलकाता उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश थोट्टाथिल बी. नायर राधाकृष्णन यांनी रजिस्ट्रीच्या सदस्यांसह जिल्हा न्यायपालिकेच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून ‘सर’ ऐवजी ‘माय लॉर्ड’ आणि ‘युवर लॉर्डशिप’ असे संबोधले जाण्याची इच्छा व्यक्त केली. 2020 मध्ये, राजस्थान उच्च न्यायालयाने एक नोटीस जारी करून वकील आणि न्यायाधीशांसमोर हजर राहणाऱ्यांनी माननीय न्यायाधीशांना “माय लॉर्ड” आणि “युवर लॉर्डशिप” असे संबोधणे टाळण्याची विनंती केली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here