तुम्ही Google वर ‘या’ गोष्टी सर्च करत नाही ना? नाहीतर खावी लागणार जेलची हवा

142

मनात कोणताही प्रश्न आला की तो सर्वप्रथम सगळेच गुगलवर सर्च करतात. गुगल हे सर्च इंजिन आहे जे तुम्हाला काहीही शोधण्यास मदत करते. गुगल सर्च इंजिनवर कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारची माहिती शोधता येते. जेवण बनवण्यापासून, मेकअप टिप्सपासून ते ताज्या घडामोडींपर्यंत…. तर काही लोक अडचणीत येऊ शकतील अशा गोष्टीही शोधण्यासाठी गुगलचा वापर करतात. मात्र त्या काही गोष्ट शोधणं तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं तर दुसरीकडे, गुगल त्याच्या सुरक्षिततेबद्दल अत्यंत काळजी घेतं. गुगलचे सुरक्षा धोरण आहे, ज्याचे धार्मिकदृष्ट्या पालनही गुगल करते. अशा परिस्थितीत, तुम्ही Google वर काहीही शोध घेताना सावधगिरी बाळगली पाहिजे. या गोष्टी तुम्ही गुगलवर सर्च केल्यास तुम्हाला थेट जेलमध्येही जावे लागू शकते. याविषयी जाणून घेऊया…

(हेही वाचा – ITBP Recruitment 2022: दहावी उत्तीर्ण आहात? दरमहा 69,000 पगाराच्या नोकरीची संधी)

चाइल्ड पॉर्न सर्च करताय

भारत सरकार चाइल्ड पोर्नोग्राफीच्या विषयावर कठोर आहे. तुम्ही हा विषय गुगलवर शोधल्यास, तुम्हाला Posco Act 2012 च्या कलम 14 अंतर्गत 5 ते 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तुम्हाला गुगलवर चाइल्ड पॉर्न पाहण्यात आणि शेअर करण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे चुकूनही चाईल्स पॉर्नोग्राफी गुगलवर सर्च करू नका. भारतात पॉक्सो ॲक्ट 2012 च्या कलम 14 अंतर्गत चाईल्ड पॉर्न पाहणं, तयार करणं आणि आपल्याकडे बाळगणं गुन्ह्यांतर्गत येतं. यामुळे तुम्हाला तुरुंगाची हवा खावा लागू शकते.

पीडिताची ओळख आणि फोटो शेअर करताय

कोणत्याही घटनेत विनयभंग झालेल्या किंवा अत्याचार झालेल्या व्यक्तीचा फोटो किंवा नाव उघड करण्यास मनाई आहे. अशा महिलेचे कोणतेही छायाचित्र, इलेक्ट्रॉनिक किंवा सोशल मीडियावर प्रकाशित करता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. असे केल्यास तुरुंगवास भोगावा लागू शकतो.

पायरेटेड चित्रपट

सिनेमॅटोग्राफी कायदा 1952 अंतर्गत, तुम्ही चित्रपट पायरसीमध्ये अडकल्यास तुम्हाला किमान तीन वर्षांचा तुरुंगवास आणि दहा लाख रुपये दंड होऊ शकतो. अनेकदा लोक पायरेटेड चित्रपट गुगलवरून डाऊनलोड करतात. परंतु असे करणेही गुन्ह्यांतर्गत येते. असे करणाऱ्या युझरवर कायदेशीर कारवाईदेखील होऊ शकते.

बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया

जर तुम्ही गुगलवर बॉम्ब कसा बनवायचा ते सर्च केले तर तुम्हाला तुरुंगात जावे लागेल. तुमच्या PC किंवा लॅपटॉपचा IP अॅड्रेस लगेच सुरक्षा अधिकार्‍यांना पाठवला जातो. त्यामुळे बॉम्ब कसा तयार केला जातो, ही पद्धत चुकूनही गुगलवर सर्च करू नका. अनेक उत्सुकतेपोटी लोकं हे सर्च करतात आणि त्यानंतर त्यांना अडचणींना सामना करावा लागतो. बॉम्ब तयार करण्याची पद्धत सर्च केल्यानं तुमच्यावर कायदेशीर कारवाईही होऊ शकते.

कस्टमर केअरचा नंबर शोधताय

कस्टमर केअरचा नंबर कधीही गुगल सर्चवरून शोधू नका. अनेकदा फसवणूक करणारे लोक बनावट क्रमांक लिस्ट करतात. गुगल सर्च इंजिन टूलच्या माध्यमातून ते रिझल्टवर दाखवतं. जेव्हा तुम्ही त्या नंबरवर फोन करता तेव्हा तुमचा फोन त्या लोकांकडे लागतो आणि तुमची फसवणूक होऊ शकते.

गर्भपात संबंधित सर्च

गुगलवर गर्भपाताविषयी सर्च करणे टाळावे. भारतात वैद्यकीय सल्ल्याशिवाय गर्भपात करणे बेकायदेशीर आहे

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.