स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त शौर्याचा होणार सन्मान! 22 मे रोजी पुरस्कार प्रदान सोहळा

114

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३९व्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे शौर्य, विज्ञान आणि स्मृतीचिन्ह पुरस्कार तसेच शिखर सावरकर पुरस्कार २०२१ चा वितरण समारंभ रविवार, २२ मे २०२२ या दिवशी सायंकाळी ७ वाजता आयोजित केला आहे. यावेळी स्मारकाने तयार केलेला समाजक्रांतिकारक सावरकर या लघुपटाचे लोकार्पणही करण्यात येणार आहे. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अतुल भातखळकर हे उपस्थित राहाणार आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, वीर सावरकर मार्ग, छत्रपति शिवाजी महाराज उद्यान, दादर (प.) मुंबई २८ येथे हा समारंभ होणार आहे. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने देण्यात येणारा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ (एक लाख एक सहस्त्र रुपये आणि मानचिन्ह- मानपत्र) कीर्तिचक्र विजेते नायब सुभेदार संतोष राळे यांना तर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार’ (एकावन्न सहस्त्र रुपये आणि मानचिन्ह- मानपत्र) डी.आर डी ओ. चे संचालक अतुल राणे यांना आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतिचिन्ह पुरस्कार’ (पंचवीस सहस्त्र रुपये आणि मानचिन्ह- मानपत्र) बडोदरा येथील वीर सावरकर स्मृति केंद्र यांना प्रदान करण्यात येणार आहे.

(हेही वाचा रेल्वे अपघातावेळी मदतीसाठी धावून गेले भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाचे सदस्य)

शिखर सावरकर पुरस्काराचेही होणार वितरण

त्याचप्रमाणे कोरोनामुळे प्रलंबित झालेला शिखर सावरकर पुरस्कार २०२१ हा देखील यावेळी देण्यात येणार आहे. या पुरस्काराच्या अंतर्गत शिखर सावरकर जीवनगौरव पुरस्कार एव्हरेस्ट वीर पद्मश्री सोनम वांग्याल, शिखर सावरकर युवा पुरस्कार सुशांत अणवेकर, मुंबई यांना तर शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था पुरस्कार रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स, रत्नागिरी यांना प्रदान करण्यात येईल. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्षा मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर आणि सहकार्यवाह स्वप्निल सावरकर यांनी या संबंधात ही माहिती दिली.

उजाळा रत्नागिरी पर्वाला…

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध झाल्यानंतर तेथे समाज सुधारणेचे एक अतिशय मोलाचे महत्त्वपूर्ण दिशादर्शक काम केले, जे समाजक्रांतिचेच होते. अशा या समाजक्रांतिकारक सावरकरांना आणि त्यांच्या कार्याला लोकांसमोर मांडणारा लघुपट स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने तयार केला आहे. त्या लघुपटाचे या समारंभात लोकार्पण करण्यात येणार आहे. हिंदु धर्मातील त्या सात बेड्यांना तोडून आणि ज्यांना मंदिर प्रवेशही निषिद्ध केला,  अशा समाजातील आपल्या बंधूंना पतितपावन मंदिरात प्रवेश देणे, सहभोजनातून आपण सारे हिंदु बंधू आहोत, ही जाणीव करून देत सावरकरांनी साधलेल्या त्यावेळच्या समाजक्रांतिला नव्या पिढीपुढे मांडणारा हा लघुपट आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.