या जिल्ह्यात ‘जल जीवन मिशन’ आणि ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानाविषयी जनजागृती!

110

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्ह्यातील २७ ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या ग्रामसभेत ‘जल जीवन मिशन’ आणि ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत सांडपाणी घन कचऱ्याच्या व्यवस्थापनाविषयी नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली. या दोन्ही अभियानाचे गावाला होणारे फायदे त्याचबरोबर कोणत्या प्रकारची कामे केली जाणार आहेत यांची विस्तृत माहिती ग्रामसेवकांनी नागरिकांना दिली.

Swacha Bharat

नागरिकांमध्ये जागृती करण्याचे निर्देश

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन होणाऱ्या ग्रामसभेत या दोन्ही अभियानाची माहिती देऊन नागरिकांमध्ये जागृती करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ग्रामसेवकांनी जल जीवन मिशन बाबत मार्गदर्शन केले. तर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नवीन शौचालय बांधणे, नादुरुस्त शौचालय दुरुस्त करणे, एक खड्डा शौचालय रूपांतर करणे, शोषखड्डा मोहिम राबविणे, आदी कामे या अभियानातून पूर्ण करण्यात येणार असल्याचीही माहिती दिली.

( हेही वाचा : मोठी बातमी! म्हाडासह एमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकांत बदल )

नियोजनपूर्वक कामांची आखणी

जिल्हातील मुरबाड, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी. शहापूर या पाचही तालुक्यातील ४३० ग्रामपंचायतीमधील ७९२ गावांपैकी ३६२ गावात सांडपाणी व घनकचऱ्याची कामे सुरु आहेत. तर जल जीवन मिशन अभियानातून १ लाख ३८ हजार ४३६ कुटूंबांना वैयक्तिक नळ जोडणीने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी नियोजनपूर्वक कामांची आखणी करून याबाबतचा आढावा नियमित घेण्यात येतो, असे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक दादाभाऊ गुंजाळ यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.