पुण्यात पैशांची राखरांगोळी!

पुण्यातून एक भयंकर प्रकार समोर आला आहे. पुण्यात एटीएम जळून खाक झाल्याची दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील अप्पर चौकात असणाऱ्या एका एटीएमला आग लागली. बिबवेवाडी अप्पर चौकातील या एटीएम मशीनला आग लागली. या परिसरातील अॅक्सिस बँकेचे हे एटीएम होते. ही आग इतकी भीषण होती की, एटीएममधील पैशांची राखरांगोळी झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

काय घडला प्रकार

पुण्यातील बिबवेवाडी अप्पर चौक, व्हीआयटी कॉलेज रोड गजानन बुक डेपोसमोर हे एटीएम आहे. एटीएम असलेल्या गाळ्यातून आगीचे मोठे लोट बाहेर येताना दिसले. प्राथमिक अंदाजानुसार, शॉट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच तत्काळ फायर ब्रिगेडची गाडी याठिकाणी रवाना झाली. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू असून ही आग नियंत्रणात येण्यासाठी नागरिक देखील धावपळ करत आहेत.

(हेही वाचा – भाजपची रणनीती! अजित पवारांच्या भेटीला बावनकुळे; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण)

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दुर्घटनेत कोणीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र एटीएम मशीनमधील नोटा जळून खाक झाल्या असल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नाही तर किती प्रमाणात आर्थिक नुकसान झाले हे देखील अद्याप समोर आलेले नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here