अयोध्येच्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Ayodhya Airport) शुक्रवारी विमानाच्या लँडिंगची यशस्वी चाचणी घेण्यात आली. अयोध्येत २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तत्पूर्वी ३० डिसेंबर रोजी पंतप्रधान अयोध्येतील विमानतळावर लँड करतील. त्यापूर्वी व्यवस्थेची चाचणी घेण्यात आली.
अयोध्येत (Ayodhya Airport) १७ ते २२ जानेवारी दरम्यान विशेष सोहळा होणार. त्यापूर्वी विविध प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुदत निश्चित करण्यात आली आहे. लवकरच अयोध्येतून विमानसेवा सुरू होणार आहे. दिल्लीहून पहिले विमान ३० डिसेंबर रोजी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळावर (अयोध्या विमानतळ) उतरेल. तत्पूर्वी, व्यवस्था तपासण्यासाठी शुक्रवार २२ डिसेंबर रोजी चाचणी घेण्यात आली. यावेळी विमान हवाई पट्टीवर यशस्वीरित्या उतरवण्यात आले.
(हेही वाचा – Politician and Disease : जेलवारी टाळण्यासाठी रुग्णालयांचा आधार)
दिल्ली ते अयोध्या अंतर १ तास २० मिनिटांत –
इंडिगो एअरलाइन्स (Ayodhya Airport) पहिल्या टप्प्यात अयोध्येपासून दिल्ली आणि अहमदाबादसाठी विमानसेवा सुरू करणार आहे. उल्लेखनीय म्हणजे इंडिगोची ही अयोध्या विमानतळावरून चालणारी पहिली विमानसेवा असेल. दिल्ली ते अयोध्या हे अंतर विमानाने १ तास २०मिनिटांत कापले जाईल, असे सांगण्यात येत आहे. (Ayodhya Airport)
अयोध्येतील विमानतळाची खास झलक#AyodhyaAirport #AyodhyaDham #ShreeRam pic.twitter.com/i0AT5QZzaO
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) December 23, 2023
(हेही वाचा – CM Eknath Shinde : मुंबईतील रखडलेल्या एसआरए प्रकल्पांना गती देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा)
भाविकांची वाहतूक सुरळीत –
अयोध्येत येणाऱ्या भाविकांची वाहतूक (Ayodhya Airport) सुरळीत करण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. येथे लवकरच आपल्याला जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज रेल्वे स्थानकाची भेट मिळणार आहे. अयोध्येचे रेल्वे स्थानक देशातील सर्वात सुंदर आणि आधुनिक सुविधांपैकी एक असेल. रेल्वे स्थानकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी रेल्वेने २४० कोटी रुपये खर्च केले आहेत. रेल्वे स्थानक परिसर १० हजार चौरस मीटरमध्ये पसरलेला आहे. रेल्वे स्थानकाचे काम ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल. (Ayodhya Airport)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community