Ayodhya: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी फटाक्यांची आतिषबाजी होणार, फटाके विक्री स्टॉल्सना परवानगी

पुण्यातील शनिवार पेठेतील वर्तक उद्यान परिसराच्या मागील बाजूस फटाका विक्री स्टॉल्स उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पुढील तीन दिवस स्टॉल्सना परवानगी दिली आहे.

249
Ayodhya: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी फटाक्यांची आतिषबाजी होणार, फटाके विक्री स्टॉल्सना परवानगी
Ayodhya: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी फटाक्यांची आतिषबाजी होणार, फटाके विक्री स्टॉल्सना परवानगी

अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा दिवाळीप्रमाणे साजरा करावा, या आदेशानंतर शहरात सर्वत्र दिवाळीप्रमाणे फटाके, कंदिल, पताका आणि भगव्या झेंड्यांची विक्री सुरू आहे.

महापालिकेनेही दिवाळीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या या शोभेच्या वस्तूंची विक्री करण्याच्या स्टॉल्सना परवानगी दिली आहे. पुण्यातील शनिवार पेठेतील वर्तक उद्यान परिसराच्या मागील बाजूस फटाका विक्री स्टॉल्स उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पुढील तीन दिवस स्टॉल्सना परवानगी दिली आहे.

(हेही वाचा – Pakistan-Iran Conflict: पाकिस्तानचा इराणच्या दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई हल्ला, 9 जण ठार)

पोलीस आयुक्त कर्यालयाकडून परवानगी
अयोध्येत सोमवारी (22 जानेवारी) श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी होणारा हा देशातील पहिला मोठा सोहळा असल्याने यानिमित्त वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू झाला आहे. त्यामुळे देशभरात दिवाळीप्रामाणे उत्साहाचे वातावरण आहे. फाटाक्यांच्या स्टॉल्सची विक्रीही सुरू आहे. जल्लोष साजरा करण्यासाठी फटाक्यांच्या स्टॉल्सना परवानगी देण्याची सूचना पोलीस आयुक्त कार्यालयाने महापालिकेला केली. त्याप्रमाणे ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून २२ जानेवारीला सर्वत्र सोहळ्याचे वातावरण असणार आहे.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.