अयोध्येत सध्या सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. प्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी करण्याकरिता अयोध्येमध्ये सर्वच जण जय्यत तयारी करत आहेत. देशाच्या विविध भागांतून सोहळ्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. लाखो लोक या प्रतिष्ठापना सोहळ्यात सहभागी होणार आहेत. १६ जानेवारी ते २२ जानेवारीपर्यंत विधिवत पूजा विधिंच्या माध्यमातून राम (Ram Mandir) लल्लाची प्राणप्रतिष्ठा होईल.
२२ जानेवारीला राम मंदिरात राम लल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे. अशा सर्व उत्साह आणि भक्तिमय वातावरणात एका बातमीमुळे मात्र आश्चर्य व्यक्त होत आहे. असं करण्यामागे नेमकं कारण काय आहे, असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे.
(हेही वाचा –Veer Savarkar: जर पुन्हा फाळणी झाली, तर हिंदूंना जगात जागा उरणार नाही; रणजित सावरकर यांचा इशारा )
राम लल्लाच्या डोळ्यावर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापर्यंत पट्टी बांधली जाणार आहे. अयोध्येत राम लल्लाच्या मूर्तीचे अनावरण १७ जानेवारी २०२४ ला होणार आहे. यादरम्यान रामनगरीत यात्रा काढली जाणार आहे. यात राम लल्लाच्या मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली असणार आहे. यामागे ज्योतिषशास्त्राचं महत्त्व सांगितलं जात आहे.
प्राणप्रतिष्ठापनेनंतर पट्टी काढली जाईल
जेव्हा कोणी भक्त देवाचे दर्शन घेतो त्यावेळी देवाच्या डोळ्यात पाहतो. अशावेळी देव आणि भक्त यांच्या डोळ्यांच्या मिलनातून भावनांची देवाणघेवाण होते. अशावेळी भगवान वशीभूत होतात आणि आपल्या प्रिय भक्तासोबत कोठेही जाण्यास तयार होतात, अशी भावना आहे. ही भावना लक्षात घेऊन यात्रेदरम्यान रामलल्लाच्या डोळ्यावर पट्टी असेल. प्राणप्रतिष्ठापनेनंतर पट्टी काढली जाईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community