Ayodhya Pranapratistha ceremony: अयोध्येत पहिल्याच दिवशी ५ लाख भाविकांनी घेतले रामलल्लाचे दर्शन, भाविकांना आवर घालण्यासाठी पोलिसांना करावा लागला सौम्य लाठीमार

मंदिराबाहेर दर्शनासाठी रांगा वाढतच असल्यामुळे जागोजागी सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांचे कडे तोडून रेटारेटी करत पुढे सरकण्याचे प्रकारही उत्साही भाविकांकडून यावेळी झाले.

175
Nashik Ram Navami: रामनवमीनिमित्त नाशिकमध्ये वाहतूक मार्गात बदल, प्रवेश बंद आणि पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या...
Nashik Ram Navami: रामनवमीनिमित्त नाशिकमध्ये वाहतूक मार्गात बदल, प्रवेश बंद आणि पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या...

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दुसर्‍या दिवसापासून म्हणजे मंगळवारपासून श्रीराम मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी खुले होताच दर्शनासाठी भाविकांची झुंबड उडाली. पहाटे ३ वाजल्यापासून रांगा लावत भक्तांनी दर्शन घेतले. (Ayodhya Pranapratistha ceremony) दिवसभरात ५ लाख भाविकांनी श्री रामलल्लाचे दर्शन घेतले.

सोमवारी श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. सोमवारी निमंत्रितांनाच दर्शन मिळू शकले; पण मंगळवारपासून सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले झाले. गेल्या तीन दिवसांपासूनच अयोध्येत हजारो भाविक दाखल झाले होते. त्यात सोमवारचा सोहळा संपल्यानंतर आणखी भाविकांची गर्दी झाली. मंदिर सकाळी ७ वाजता उघडणार असले, तरी पहाटे ३ पासूनच भाविकांनी रांगा लावल्या. मुख्य मंदिर संकुलाबाहेर लांबच लांब रांगा वाढत गेल्या. रामलल्लाच्या दर्शनासाठी आतूर झालेल्या भाविकांना कधी एकदा डोळे भरून रामलल्लाचे अद्वितीय रूप डोळ्यांत साठवतो, असे झाले होते. ७ वाजता मंदिर उघडले आणि भाविकांची प्रचंड गर्दी मंदिरात शिरू लागली.

(हेही वाचा – Pakistani Public Reaction: राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पाकिस्तानी संतप्त, पाकिस्तानातील मंदिरांवर हल्ला करण्याची चर्चा )

पोलिसांना करावा लाठीमार
मंदिराबाहेर दर्शनासाठी रांगा वाढतच असल्यामुळे जागोजागी सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांचे कडे तोडून रेटारेटी करत पुढे सरकण्याचे प्रकारही उत्साही भाविकांकडून यावेळी झाले. या सर्व भाविकांना आवरता आवरता पोलीस यंत्रणांना नाकी नऊ येत होते. रांगेत काही ठिकाणी पोलिसांना या भाविकांना आवरण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला.

शरयू घाटावरही भाविकांची गर्दी
भाविकांच्या गर्दीने पहिल्याच दिवशी रेकॉर्ड मोडले असून, अयोध्येत पाय ठेवायलाही जागा राहिली नाही. सारे पार्किंग लॉट फुल्ल झाले असून, अखेर अयोध्येबाहेर काही कि.मी. अंतरावर वाहने लावून भाविकांना रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत यावे लागत आहे. अयोध्येत जेथे जाल तेथे रामनामाचा जयघोष करणार्‍या भाविकांशिवाय दुसरे कोणतेही चित्र दिसत नाही, अशी स्थिती आहे. शरयूचे घाटही भाविकांच्या गर्दीने फुलून गेले असून, शहरातील दुकाने, हॉटेलांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.

भाविकांना रोखावे लागले…
अयोध्येत पाय ठेवायला जागा नसतानाही अयोध्येकडे जाणार्‍या भाविकांच्या गर्दीने रस्ते तुडुंब भरले आहेत. लखनौपासून 30 कि.मी.वर असलेल्या बाराबंकीमध्ये तर एवढी गर्दी झाली की, तेथील पोलिसांना अयोध्येला जाणार्‍या भाविकांना रोखण्याशिवाय पर्याय राहिला नाही. अयोध्येला पायी निघालेल्या भाविकांनाही रोखण्यात आले. दुपारनंतर भाविकांना गटागटाने मंदिरात सोडण्यात आले.

हेही पहा –  

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.