अयोध्येतील श्रीराम मंदिराचे बांधकाम वेगाने सुरु आहे. असे असतानाच अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख समोर आली आहे. पुढील वर्षी २१ ते २३ जानेवारी दरम्यान अयोध्येतील मंदिरातील गर्भगृहात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण देण्यात आले असून, त्यांची वेळही मागून घेण्यात आली असल्याची माहिती राम मंदिर प्रतिष्ठानच्या विश्वस्तांनी दिली.
‘इतक्या’ संतांना करणार आमंत्रित
अयोध्येत पार पडणाऱ्या श्री रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी २५००० संतांना आमंत्रित केले जाणार असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली. राय म्हणाले, सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात येणाऱ्यांची यादी बनवण्यात आली असून, लवकरच श्री रामजन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांची स्वाक्षरी असणाऱ्या निमंत्रण पत्रिका पाठवण्यात येणार आहेत. ट्रस्टने अयोध्येतील मोठ्या मठांमध्ये सर्व प्रमुख संतांना निमंत्रीत करण्याची योजना आखली आहे. या २५००० संत १०००० खास पाहुण्यांपेक्षा वेगळे असतील जे रामजन्मभूमीच्या आवारात होणाऱ्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहतील.
(हेही वाचा – Grading : घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी ‘ही’ शोभेचे झाडे लावा…)
जानेवारी महिन्यात भाविकांना मिळणार मोफत भोजन
अयोध्येत प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना महिनाभर मोफत भोजन देण्याची योजना ट्रस्टने राबवली आहे. राय यांच्या म्हणण्यानुसार, ट्रस्ट संपूर्ण जानेवारीमध्ये दररोज ७५,०००-१,००,००० भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचबरोबर, श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचे देशभरात प्रक्षेपण करण्यासाठी जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community