Ayodhya Ram Mandir: अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर साजरी होणार पहिली ‘श्रीराम नवमी’; कशी सुरू आहे प्रशासनाची तयारी ? जाणून घ्या…

प्रभू श्रीरामाच्या कपाळावर रामनवमीच्या दिवशी अभिजीत मुहूर्तावर सूर्याची किरणे पडतील.

213
Ayodhya Ram Temple: रामनवमीच्या दिवशी अयोध्येत होणारा सूर्याभिषेक आनंददायी!
Ayodhya Ram Temple: रामनवमीच्या दिवशी अयोध्येत होणारा सूर्याभिषेक आनंददायी!

जगभरातील रामभक्तांसाठी यंदाची ‘श्रीराम नवमी’ म्हणजे विलक्षण आनंददायी पर्वणी असणार आहे. संस्कृती, परंपरा, सात्त्विकता, संयम शौर्य यांसह एकवचनी, एकबाणी, एकपत्नी…असा अलौकिक अवतार असलेल्या प्रभु श्रीरामाचा जन्मोत्सव अर्थात रामनवमी सोहळा अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर प्रथमच बुधवारी (१७ एप्रिल) साजरा केला जाणार आहे. त्यामुळे हा सोहळा भव्यदिव्य स्वरुपात साजरा करण्यासाठी अध्योधा नगरीत जय्यत तयारी सुरू आहे. (Ayodhya Ram Mandir)

अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होऊन तीन महिने उलटले…त्यानंतर आता गुढीपाडव्यापासूनच रामनवमीची जोरदार तयारी अयोध्येत सुरू आहे. रामलल्लाच्या मंदिरात विराजमान झाल्यानंतर ही यंदाची (१७ एप्रिल २०२४) पहिलीच रामनवमी साजरी होणार आहे. त्यामुळे या सोहळ्याला अनोखं महत्त्व प्राप्त झालं आहे.

कशी सुरू आहे तयारी ?
२२ जानेवारी २०२४ ला अयोध्यानगरीत डोळ्यांचं पारण फेडेल असा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडला. जगभरातील लाखो भविकांनी याचि देही, याचि डोळा पाहिला. अशाच सोहळ्याची अनुभूती रामभक्तांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. येत्या रामनवमीला १७ एप्रिल २०१४ रोजी तब्बल ५०० वर्षांच्या वनवासानंतर रामलला भव्यदिव्य अशा मंदिरात विसावले. त्यानंतर येणारी ही पहिली रामनवमी. अयोध्येत रस्तोरस्ती रांगोळ्यांचा सडा, रंगबेरंगी फुलांची सजावट, डोळे दिपून जातील अशी विद्युत रोषणाई, लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघालेला आसमंत, तेवत असलेल्या लाखो पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघालेला शरयू नदीचा तीर, मनमोहक फुलांच्या सजावटीने सजून बसलेली राम मंदिराची प्रत्येक भिंत अन् रामनामात चिंब भिजलेली लाखो रामभक्तांची मांदियाळी….असे वातावरण सध्या अयोध्येत पाहायला मिळत आहे.

(हेही वाचा –Retail Inflation Rate : देशाचा किरकोळ महागाई दर १० महिन्यांतील निच्चांकावर  )

सूर्यतिलकाची यशस्वी चाचणी…
प्रभू श्रीरामाच्या कपाळावर रामनवमीच्या दिवशी अभिजीत मुहूर्तावर सूर्याची किरणे पडतील तेव्हा सुवर्ण वातावरणात प्रभूरामाचा राजतिलक होणार आहे. त्यासाठीची चाचणीही यशस्वीरित्या करण्यात आली आहे. त्यामुळे सात्त्विकतेचा महन्मंगल सोहळा डोळ्यांत साठवून घेण्यासाठी भारतासह जगभरातून रामभक्त अयोध्येत येतील, अशी माहिती श्रीराम मंदिर ट्रस्टकडून देण्यात येत आहे.

सुरक्षा व्यवस्था आणि रामभक्तांच्या सोयीसाठी प्रशासन सज्ज
– अयोध्येत तब्बल ५० लाख भाविक येण्याची शक्यता
– भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासनाची जय्यत तयारी
– भाविकांच्या निवास, भोजनासाठी खास सुविधा असणार
– भक्तांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी
– परदेशी भाविकांना १४ दिवस क्वारंटाईन करण्यात येणार
– सुरक्षेसाठी पोलीस, लष्करी जवानांची पथकं तैनात असणार
– शरयू नदीत सहा फायबर बोट तैनात

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.