Ayodhya Ram mandir : दिव्य भारताच्या निर्मितीची शपथ घेऊया; पंतप्रधानांचे भावूक आवाहन

Ayodhya Ram mandir : राम आग नाही; राम ऊर्जा आहे. राम भारताचा आधार आहेत. राम भारताचा विचार आहे. राम भारतवासियांच्या अंतर्मनात विराजमान झाले आहेत, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत.

267
Ayodhya Ram mandir : दिव्य भारताच्या निर्मितीची शपथ घेऊया; पंतप्रधानांचे भावूक आवाहन
Ayodhya Ram mandir : दिव्य भारताच्या निर्मितीची शपथ घेऊया; पंतप्रधानांचे भावूक आवाहन

प्रत्येक भारतियाने या ठिकाणी समर्थ आणि सक्षम भारताच्या निर्मितीची शपथ घेऊया. (Ayodhya Ram mandir) ती देव ते देश आणि राम ते राष्ट्र या चेतनेचा विस्तार आहे. या मंदिराचया निमित्ताने इतिहासातील एक गाठ खोलली आहे. ती गाठ सांगत आहे, आपले भविष्य आपल्या इतिहासापेक्षा सुंदर होणार आहे. येणार काळ सफलतेचा आहे. हे मंदिर भारताच्या उत्कर्षाचे साक्षी बनेल. हा भारताचा वेळ आहे. भारत आता पुढेच जाणार आहे, असे आश्वासक उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काढले.

(हेही वाचा – Eknath Shinde उद्यान मंदिर, शिवाजी पार्क ते भोईवाडा राम मंदिर शोभयात्रेत सहभाग)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राममंदिरात रामलल्लाची स्थापना करण्यात आली. त्या वेळी पंतप्रधान यांनी हे भावूक उद्गार काढले. या वेळी व्यासपिठावर सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat), उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath), राज्यपाल आनंदीबेन पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. (ram lala mandir ayodhya)

न्याययंत्रणेचे आभार

पंतप्रधान या वेळी म्हणाले, ”मी या क्षणी दैवी अनुभव घेत आहे. राममंदिरासाठी बलीदान दिले, ते दैवी आत्मा या क्षणी आपल्या आसपास उपस्थित आहेत. मी भारताच्या न्याययंत्रणेचे आभार मानतो. त्यांनी न्यायाचा आदर केला. देशभरात दीपावली साजरी केली जात आहे. घराघरात रामज्योती प्रज्वलित करण्याची तयारी केली जात आहे. राम भारताच्या अंतरात्म्याशी जोडलेले आहेत. ” (ayodhya ram janmabhoomi)

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : आज कारसेवकांचे आत्मे सुखावले, शरयू नदी हसली ; राज ठाकरे यांची पोस्ट व्हायरल)

राम भारताचा आधार आहे

काही जण विरोध करत आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो, राम आग नाही; राम ऊर्जा आहे. राम भारताचा आधार आहेत. राम भारताचा विचार आहे. राम भारतवासियांच्या अंतर्मनात विराजमान झाले आहेत. माझे सौभाग्य आहे, मला सागरापासून शरयूपर्यंत प्रवास करण्याचे सौभाग्य मिळाले. (Ayodhya Ram mandir)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.