Ayodhya Ram Mandir: अयोध्येत अनियंत्रित गर्दीमुळे लखनऊला जाणाऱ्या स्पेशल बसेस बंद

229
Ayodhya Ram Mandir: अयोध्येत अनियंत्रित गर्दीमुळे लखनऊला जाणाऱ्या स्पेशल बसेस बंद
Ayodhya Ram Mandir: अयोध्येत अनियंत्रित गर्दीमुळे लखनऊला जाणाऱ्या स्पेशल बसेस बंद

अयोध्येत (Ayodhya Ram Mandir) २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा झाल्यानंतर २३ जानेवारीपासून राम मंदिर भाविकांसाठी खुले झाले आहे. मध्यरात्री ३ वाजल्यापासून दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती. रामलल्लाच्या दर्शनासाठी अनेक राज्यांतून लोकं आले होते. मंदिराचे दरवाजे उघडताच मंदिरात प्रवेश करण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.

दुपारी बंद केलेले प्रभु श्रीरामाच्या मंदिराचे दरवाजे तासाभरापूर्वीच उघडण्यात आले, यावरून दर्शनासाठी जमलेल्या गर्दीचा अंदाज येतो. रामलल्लाच्या झोपेचे दरवाजे दुपारी १२.३० ते २ वाजेपर्यंत बंद राहणार होते, मात्र गर्दीमुळे ते दुपारी १ वाजताच उघडण्यात आले. दर्शनासाठी छोटे-छोटे समूह करून लोकांना पाठवले, मात्र सुरक्षा तोडून लोकं पळून गेले.

दुपारी झोपण्यासाठी बंद केलेले प्रभू रामलल्लाचे दरवाजे तासाभरापूर्वीच उघडण्यात आले, यावरून दर्शनासाठी जमलेल्या गर्दीचा अंदाज येतो. रामलल्लाच्या झोपेचे दरवाजे दुपारी 12.30 ते 2 वाजेपर्यंत बंद राहणार होते, मात्र गर्दीमुळे ते दुपारी 1 वाजताच उघडण्यात आले. दर्शनासाठी छोट्या गटात लोकांना पाठवले जात आहे. एकदा सुरक्षा तोडून लोक पळून गेले.

(हेही वाचा – CM Eknath Shinde : अवयवदान चळवळीला वेग येण्यासाठी जनजागृती करावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश)

दुपारी दोन वाजेपर्यंत अडीच लाख लोकांनी दर्शन घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 8 दंडाधिकारी तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर राम मंदिराच्या गर्भगृहात बसवण्यात आलेल्या नव्या मूर्तीला बालक राम असे नाव देण्यात आले आहे.

लखनऊहून अयोध्येला जाणाऱ्या बसेस रोखल्या…
अयोध्येतील भाविकांची वाढती गर्दी पाहता लखनऊहून अयोध्येला जाणाऱ्या विशेष बसेस बंद करण्यात आल्या आहेत. परिवहन विभागाने सांगितले- पुढील आदेश येईपर्यंत या बसेस धावणार नाहीत. ज्या प्रवाशांनी या बसेसचे ऑनलाइन बुकिंग केले आहे, त्यांची तिकिटे रद्द करून पैसे परत केले जातील.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.