अयोध्येत (Ayodhya Ram Mandir) आगामी २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तत्पूर्वी मंदिराच्या गाभाऱ्याचा एक फोटा समोर आला आहे. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी X वर गर्भगृहाचा फोटो शेअर केला आहे.
श्रीराम मंदिरातील (Ayodhya Ram Mandir) मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेची जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, श्रीराम मंदिराचे गर्भगृह कसे असेल, याचा अंदाज येईल, असे काही फोटो शेअर करण्यात आले आहे. चंपत राय यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये २ फोटो शेअर केले आहेत. श्रीराम मंदिराच्या गाभाऱ्याची एक झलक असल्याचे चंपत राय यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
प्रभु श्री रामलला का गर्भ गृह स्थान लगभग तैयार है। हाल ही में लाइटिंग-फिटिंग का कार्य भी पूर्ण कर लिया गया है। आपके साथ कुछ छायाचित्र साझा कर रहा हूँ। pic.twitter.com/yX56Z2uCyx
— Champat Rai (@ChampatRaiVHP) December 9, 2023
(हेही वाचा – Me Sanatan Dharma Rakshak : सनातन धर्म नष्ट करण्यासाठी अर्बन नक्षलवाद्यांकडून सातत्याने षडयंत्रे चालू ! – रमेश शिंदे)
भगवान श्रीरामलल्ला (Ayodhya Ram Mandir) यांचे गर्भगृह जवळपास तयार झाले आहे. नुकतेच लाइटिंग-फिटिंगचे काम पूर्ण झाले आहे. याचे काही फोटो तुमच्यासोबत शेअर करत आहे, असे चंपत राय यांनी म्हटले आहे. रामलल्लाची मूर्ती १५ डिसेंबरपर्यंत घडवून पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. तळमजला ३१ डिसेंबरपर्यंत तसेच पहिल्या मजल्यापर्यंतचे काम पूर्ण करण्याची डेडलाइन देण्यात आली आहे. दिलेल्या डेडलाइननुसार काम पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या सोहळ्यासाठी निमंत्रित केलेल्या मान्यवरांनी काही दिवस आधीच अयोध्येत यावे, जेणेकरून गैरसोय होणार नाही, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) दर्शनाबाबत सोशल मीडियावर सातत्याने प्रश्न विचारले जात आहेत. राम मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या १० ते १५ हजार लोकांना रात्री मुक्काम करायचा असेल तर त्यांना निवारा कुठे मिळेल? त्यांना अन्न-पाणी कोठून मिळणार? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. यासाठी ट्रस्ट नवीन टीनशेड सिटी उभारत आहे. हे काम फेब्रुवारीच्या अखेरीस तयार होईल. या कामासाठी देशभरातून विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनुभवी कार्यकर्त्यांना पाचारण करण्यात येत असून सर्वजण आपापले कर्तव्य बजावत असल्याची माहिती चंपत राय यांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community