यंदा १७ एप्रिल या दिवशी रामनवमी आहे. आता अयोध्येतील रामजन्मभूमीवर रामललाचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. या नूतन राम मंदिरात ५०० वर्षांनंतर श्रीराम जन्माचा आनंदसोहळा संपन्न होणार आहे. या निमित्ताने आम्ही देशभरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि श्रीरामभक्त यांच्याशी संवाद साधला. त्यांनी श्रीरामजन्मभूमीवर ५०० वर्षांनंतर साजऱ्या होणाऱ्या या दिव्य उत्सवाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. (Ayodhya Ram Temple)
२०२४ संपण्यापूर्वीच हिंदु राष्ट्रही येईल !
परकीय आक्रमणांच्या काळात मुसलमानांचा मंदिरे तोडण्याकडे कल होता. भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुसलमानांचे भाऊबंद असलेले काँग्रेसवाले सत्तेवर आल्यामुळे राममंदिर उभे राहण्यासाठी काहीच प्रयत्न झाले नाहीत. उलट मंदिराच्या उभारणीसाठी काहीही करायला गेलो, तरी त्यांचा विरोधच होता. असे असले, तरी हिंदु राष्ट्र होवो, ही परमेश्वराची इच्छा होती. त्या परमेश्वरी इच्छेने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रयत्नांनी राममंदिर तर झालेच, त्याहीपुढे जाऊन २०२४ हे वर्ष संपण्यापूर्वीच हिंदु राष्ट्रही येईल, असा मला विश्वास आहे.
– भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे, ज्येष्ठ कीर्तनकार
हिंदूंना स्वातंत्र्याच्या ‘स्व’ चा अर्थ समजला!
अयोध्येतील राम मंदिरामुळे देशासह जगभरातील हिंदूंना स्वातंत्र्याच्या ‘स्व’ चा अर्थ समजला. राम मंदिराचा ५०० वर्षांचा संघर्ष म्हणजे संतांच्या, कारसेवकांच्या बलिदानाचा विजय आहे, हा संविधानाचा विजय आहे. मुघलांनी ज्या मंदिरावर घाला घातला, त्यांचा बिमोड म्हणून राम मंदिराची निर्मिती आहे. त्यामुळे रामनवमीच्या दिवशी खऱ्या अर्थाने तिथे विजयाची पताका फडकणार आहे. या मंदिरामुळे हिंदूंना रोजगार मिळणार आहे. रामनवमी साजरी करत असताना हिंदू एकत्र आला, त्याचा स्वाभिमान जागृत झाला, रामनवमीच्या निमित्ताने अयोध्येतील राम मंदिर हे हिंदूंना संघटित होण्याची प्रेरणा देईल. तसेच याद्वारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अखंड भारत हा विचार सत्यात उतरणार आहे.
शंकर गायकर, विश्व हिंदू परिषद, केंद्रीय सहमंत्री
५०० वर्षांची गुलामी संपली!
५०० वर्षांची ही गुलामी होती, राजकीय गुलामी, धार्मिक गुलामी होती, मुसलमानांनी मोठ्या प्रमाणावर धर्मक्षेत्रांचा विध्वंस केला होता. त्या सर्व धर्मक्षेत्रांच्या विध्वसांचे प्रतीक म्हणून आज अयोध्येत राम मंदिर उभे राहिले आहे. अयोध्या तो झांकी है काशी – मथुरा बाकी है, मला वाटते तो एक मोठा भव्य सोहळा होणार आहे. १२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला आले होते, तेव्हा त्यांना आम्ही इथे १० दिवसांचा संकल्प दिला. व्रत, जप, तप, स्वाध्याय याचे पालन करत भारतातील प्रमुख १० रामतीर्थ आहेत, जेथे प्रभू श्रीरामचंद्र प्रत्यक्ष गेले होते, त्या ठिकाणी नरेंद्र मोदी प्रत्यक्ष गेले, तिथे पूजा केली आणि नंतर ते अयोध्येला आले. मीही अयोध्येला रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी उपस्थित होतो. तो क्षण भव्यदिव्य होता. या दिवसासाठीच आपण जन्माला आलो होतो का, अशी भावना मनात निर्माण झाली होती. त्यावेळी महाराष्ट्रातील सर्वात जास्त विद्वान त्या कार्यक्रमात होते. नाशिक हे सिंहस्थ कुंभमेळा स्थान आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी या भागाचाही कॉरिडॉरप्रमाणे विकास करावा, अशी अपेक्षा आहे.
– श्री महंत सुधीरदास पुजारी, काळाराम मंदिराचे मुख्य पुजारी.
(हेही वाचा – Nashik Ram Navami: रामनवमीनिमित्त नाशिकमध्ये वाहतूक मार्गात बदल, प्रवेश बंद आणि पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या… )
भारत हिंदू राष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण करेल!
५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आणि हिंदूंच्या सहनशीलतेनंतर अयोध्येमध्ये रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि २२ जानेवारीनंतर केवळ आयोध्यातच नव्हे, भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात एक नवचैतन्य पसरले. हिंदुत्ववाद्यांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत एक रामराज्याची ऊर्जा निर्माण झाली. त्या दिवसापासून आजपर्यंत सर्व ठिकाणी एक जे हिंदुत्वमय, राममय वातावरण तयार झालेले आहे. याचा लाभ अर्थातच रामराज्यासाठी किंवा हिंदू राष्ट्रासाठी होणार आहे. त्यातच या अयोधेमध्ये रामराललांच्या जन्मस्थळी पहिला रामनवमीचा उत्सव मंदिरात साजरा होत आहे, हा दुग्ध शर्करा योग आहे. या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात सर्वत्र चैतन्य पसरून लोकांमध्ये एक नवचेतना निर्माण होईल. या सर्वांचा लाभ म्हणजे भारत पुन्हा एकदा विश्वगुरू पदावर विराजमान होईल. हिंदु राष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण होईल, असे यातून वाटत आहे. आज एका मंदिरामधून जर एवढी ऊर्जा आणि चैतन्य सर्व ठिकाणी प्रसारित होऊन लोकांमध्ये उत्साह वाढत असेल तर भारतातल्या प्रत्येक मंदिरामध्ये, प्रत्येक राम मंदिरामध्ये हा रामोत्सव, रामनवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला पाहिजे, जेणेकरून सर्व हिंदू बांधवांमध्ये जागृती होईल आणि रामराज्याच्या स्थापनेसाठी सर्वजण सिद्ध होतील. सर्व बांधवांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, जयतु जयतु हिंदुराष्ट्रम!!!
– सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ
रामनवमीच्या दिवशी अयोध्येत होणारा सूर्याभिषेक आनंददायी!
प्रभु श्रीराम आणि अयोध्या यांचे एक अतूट नाते आहे. भगवान श्रीकृष्णाने आपल्या अवतारकार्यात मथुरा, वृंदावन, कुरुक्षेत्र, इंद्रप्रस्थ, आणि द्वारका असे अनेक ठिकाणी निवास केले; मात्र श्रीरामाने लंका विजयानंतर ही ‘जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपी गरियसी’ म्हणून अयोध्येचं आपल्या जीवनातील महत्त्व सांगितले होते. त्यामुळे वनवासातून १४ वर्षांनी परत आल्यावर ज्याप्रमाणे अयोध्यावासीयांनी प्रभु श्रीरामाचे आगमन साजरे केले होते, त्याची झलक ५०० वर्षांनी अयोध्येत प्रभु श्रीरामललाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा होत असताना संपूर्ण देशाने पाहिली आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या श्रीरामनवमीला पवित्र अयोध्याभूमीच्या जन्मनगरीत हा सोहळा पुन्हा पहाणे श्रीरामभक्तांना सुखद आणि आनंददायक असणार आहे. त्या दिवशी निर्माण होत असलेल्या मंदिरांच्या शिल्पकलेचं अप्रतिम अनुभव म्हणून सूर्याची थेट किरणे श्रीरामललाच्या माथ्यावरील तिलकावर प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हा सूर्यतिलक करण्याचा प्रयत्न म्हणजे एक अप्रतिम अनुभव असेल. आपणही या प्रसंगी श्रीरामाच्या भक्तीत रंगून हा सोहळा अनुभवण्याचा प्रयत्न करू शकतो.
– रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदू जनजागृती समिती
३ लाखांहून अधिक श्रीराम भक्तांच्या बलिदानाचे फलित!
कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रामललांच्या मूर्तीची अयोध्येतल्या मंदिरात २२ जानेवारी २०२४ रोजी प्राणप्रतिष्ठा झाली. जवळजवळ ५०० वर्षांच्या संघर्षानंतर आणि तीन लाखांहून अधिक श्रीराम भक्तांच्या बलिदानामुळे हा ऐतिहासिक दिवस पाहण्याचे भाग्य लाभले. १९८४ झाली दिल्लीच्या विज्ञान भवनात संतांच्या नेतृत्वाखाली श्रीराम जन्मभूमी मुक्ती यज्ञ समितीची स्थापना झाली, त्या दिवसापासून मी या आंदोलनाशी जोडला गेलो. कडी-कुलपात बंद असलेली श्रीराम जन्मभूमी मुक्त होईल आणि वादग्रस्त ढांचा हटवून त्या ठिकाणी श्रीरामललांचे मंदिर उभे राहील या ठाम विश्वासाने त्यावेळचे विश्व हिंदू परिषदेचे नेते माननीय अशोकजी सिंघल यांच्या नेतृत्वाखाली विविध जबाबदाऱ्या स्वीकारत अनेकानेक कार्यक्रमात सहभागी होत राहिलो. १९९०च्या पहिल्या कारसेवेत महोबाच्या जेलमध्ये पंधरा दिवसांचा मुक्कामही झाला. शेवटी १८८५ पासून सुरू झालेल्या न्यायालयीन लढ्याची अखेर झाली. २०१९ साली न्यायालयाने घोषणा केली, ‘सब भूमी रामलला की’. जीवन धन्य झाले. २२ जानेवारी नंतर ज्यावेळी अयोध्येत दर्शनासाठी गेलो त्यावेळी डोळ्यांमधून अश्रूधारा वाहत होत्या. आनंदाचे, कृतार्थतेचे, ध्येयपूर्तीचे ते अश्रू होते. आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून ज्यात सहभाग दिला, त्याच्या पूर्णाहूतीचे दर्शन घेण्याचे भाग्य ज्या मोजक्या राम भक्तांना लाभले त्यात मी आहे, यापेक्षा जीवनात वेगळे समाधान ते काय हवे!
– मोहन सालेकर, प्रांत मंत्री, विहिंप.
हजारो मंदिरे इस्लामी अतिक्रमणातून मुक्त व्हावीत!
श्रीराम जन्मभूमीवर आज रामलला विराजमान झाले आहेत. यंदाची रामनवमी अत्यंत उत्साहवर्धक आहे. शेकडो वर्षांपूर्वी जिहादी आक्रमकांनी हिंदूंच्या मंदिराचे भंजन केले आणि तिथे मशीद उभारली. आज त्या ठिकाणी मंदिर उभे आहे आणि रामजन्माचा आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे. याचा निश्चितच आनंद आहे. ज्याप्रमाणे रामजन्मभूमीवरील जिहादी अतिक्रमण हटवले गेले आणि तेथे मंदिर उभे राहिले, त्याचप्रमाणे भारतभरातील हजारो मंदिरे इस्लामी अतिक्रमणातून मुक्त व्हावीत. लवकरच काशी आणि मथुरा येथेही अशाच प्रकारे आनंद साजरा करण्यास मिळेल !
– अॅड. कृष्णराज, ज्येष्ठ वकील, केरळ उच्च न्यायालय
हेही पहा –
Join Our WhatsApp Community