मी आज प्रभु श्रीरामाच्या चरणी क्षमायाचना करतो. (Ayodhya Rammandir) आमच्या तपस्येत काही तरी कमी राहिली होती. की, आम्ही इतकी वर्षे ते कार्य करू शकलो नाही. आमच्या अनेक पिढ्यांनी हा वियोग सहन केला आहे. प्रभु राम आज आम्हाला अवश्य क्षमा करतील, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी खंत व्यक्त केली. ते रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर राष्ट्राला संबोधित करत होते. (shri ram mandir ayodhya)
(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : आज कारसेवकांचे आत्मे सुखावले, शरयू नदी हसली ; राज ठाकरे यांची पोस्ट व्हायरल)
भारतीय समाजाच्या परिपक्वतेचा क्षण
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आजच्या ऐतिहासिक काळात ज्यांच्यामुळे आपण शुभ दिवस पाहत आहोत, त्या व्यक्तिमत्त्वांचे स्मरणही देश करत आहे. त्या अगणित करसेवकांचे, संतांचे, महात्म्यांचे आम्ही ऋणी आहोत. आजचा दिवस केवळ उत्सवाचा क्षण नाही, तर भारतीय समाजाच्या परिपक्वतेचाही क्षण आहे. हा क्षण केवळ विजयाचाच नाही, तर नम्रतेचाही आहे. अनेक राष्ट्रे स्वतःच्या इतिहासात अडकतात. (ram lala mandir ayodhya)
(हेही वाचा – Ayodhya Ram mandir : दिव्य भारताच्या निर्मितीची शपथ घेऊया; पंतप्रधानांचे भावूक आवाहन)
उज्ज्वल भविष्याच्या वाटेवर पुढे जाण्याची प्रेरणा
‘जेव्हा-जेव्हा त्यांनी इतिहासाच्या गाठी सोडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा कठीण परिस्थिती निर्माण झाली. (shree ram mandir ayodhya) आपण भावनेने आणि शहाणपणाने उघडलेली गाठ दाखवते की भविष्य खूप सुंदर असणार आहे. राम मंदिर बांधले तर आग लागेल असे काही लोक म्हणायचे. राम मंदिर आगीला जन्म देत नाही तर ऊर्जेला जन्म देत आहे. या समन्वयामुळे उज्ज्वल भविष्याच्या वाटेवर पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली आहे’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी या वेळी म्हणाले. (Ayodhya Rammandir)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community