अयोध्येत (Ayodhya Shri Ram Temple) होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. रामलल्लाचा अभिषेक सोमवारी, २२ जानेवारीला होणार आहे. रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टकडून येथील संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ऐतिहासिक अशा या सोहळ्यासाठी आमंत्रित केलेल्या पाहुण्यांमध्ये भारतातील विविध खेळातील शिलेदांरांचाही समावेश आहे.
२२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी क्रीडा जगतातील अनेक दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांचा समावेश आहे. भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह रवींद्र जडेजा यांचाही या यादीत समावेश आहे.
(हेही वाचा – Eknath Shinde: स्मार्ट सिटी उभारणीसाठी दावोस येथे करार, आदर्श विकास केंद्र उभारण्याचा एमएमआरडीएचा मानस)
याशिवाय मान्यवर आणि दिग्गज खेळाडूंमध्ये सुनिल गावस्कर, कपिल देव, अनिल कुंबळे आणि भारताच्या महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज आणि विद्यमान कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या नावाचाही समावेश आहे. भारतीय क्रिकेट संघाला २५ जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत पहिला सामना खेळायचा असल्याने कोणते खेळाडू प्राणप्रतिष्ठा सोहल्यात सहभागी होतील, हे निश्चितच पाहण्याजोगे आहे.
हेही पहा –