Azad Engineering Share Price : आझाद इंजिनिअरिंग शेअरला ५ टक्क्यांचं अपर सर्किट

Azad Engineering Share Price : सिमेन्स कंपनीने आझाद इंजिनिअरिंगबरोबर ५ वर्षांसाठी करार केला आहे 

235
Azad Engineering Share Price : आझाद इंजिनिअरिंग शेअरला ५ टक्क्यांचं अपर सर्किट
Azad Engineering Share Price : आझाद इंजिनिअरिंग शेअरला ५ टक्क्यांचं अपर सर्किट
  • ऋजुता लुकतुके

केंद्रसरकारला देशाला संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवायचं आहे. त्यामुळे मागच्या १० वर्षांत संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक झाली आहे. आझाद इंजिनिअरिंग कंपनीचा डिसेंबर २०२३ मध्ये आयपीओ येऊन ती शेअर बाजारात दाखल झाली आहे. आणि पहिल्या सहामाहीत कंपनीच्या चांगल्या कामगिरीमुळे कंपनीचा शेअर नवीन उच्चांक करताना दिसत आहे. शुक्रवारी कंपनीच्या शेअरमध्ये ५ टक्के वाढ होऊन अपर सर्किट लागू झालं. एका सत्रात शेअर ५ टक्क्यांनी अचानक वाढला की, शेअर बाजार सर्किट लागू करून शेअरमधील पुढचे व्यवहार काही काळासाठी स्थगित करतं. आणि मग आधी झालेले व्यवहार तपासून त्यात काही अनुचित नाही ना हे तपासलं जातं. सगळे व्यवहार योग्य असतील तर सर्किट काढून शेअरची खरेदी – विक्री पुन्हा सुरू होते. (Azad Engineering Share Price)

(हेही वाचा- Jammu and Kashmir मध्ये ५०० स्पेशल पॅरा कमांडो तैनात; ५०-५५ पाकिस्तानी दहशतवादी असल्याचा संशय!)

आझाद इंजिनिअरिंगचा शेअर शुक्रवारी ५ टक्क्यांनी वाढून १,७८१ वर बंद झाला. सिमेन्स या जर्मनीतील आघाडीच्या कंपनीने आझाद इंजिनिअरिंगबरोबर पाच वर्षांसाठी करार केला आहे. आणि या बातमीमुळे कंपनीच्या शेअरमध्ये ही उसळी पाहायला मिळाली. (Azad Engineering Share Price)

Untitled design 2024 07 20T105909.840

विशेष म्हणजे आझाद इंजिनिअरिंगचा शेअर आयपीओमध्ये ५९४ रुपयांवर नोंदणीकृत झाला होता. आणि तेव्हापासून जुलै महिन्यापर्यंत हा शेअर तब्बल १५९ टक्क्यांनी वाढला आहे. मे महिन्यात कंपनीने गॅस टर्बाईन रिसर्च कंपनीची निविदा जिंकली होती. अशा भक्कम ऑर्डरमुळे कंपनीचा शेअर वाढत आहे. डिसेंबरपासून शेअरमध्ये तिप्पट वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीने ३४१ कोटी रुपये इतका महसूल कमावला आहे. तर निव्वळ नफाही ५४ कोटी रुपयांच्या घरात आहे. (Azad Engineering Share Price)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.