श्रद्धा हत्याकांडानंतर संपूर्ण देश हादरला आहे. या हत्याकांडानंतर या प्रकरणात हादरून सोडणारे नवीन खुलासे समोर येत आहेत. अशातच आता या प्रकरणाशी मिळते-जुळते प्रकरण उत्तर प्रदेशातून समोर आले आहे.
काय आहे प्रकरण
उत्तर प्रदेशमधील आझमगढमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी विहिरीत एक मृतदेह आढळून आला होता. पण हा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत होता. या मृतदेहाचे ५ ते ६ तुकडे केले होते. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन आरोपीला अटक केली आहे. यावेळी पोलीस आणि आरोपीमध्ये मोठी झटापट देखील झाली. आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. यानंतर या निघृण हत्येचा उलगडा झाला. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मृतदेहाचे शीर ताब्यात घेतले असून आरोपीने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची कबुलीही दिली आहे. आरोपीचे नाव प्रिंस यादव असल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा – #27HrsBlock: कर्नाक रोड ओव्हर ब्रिज हटवण्यासाठी ब्लॉक होता तरीही BEST सेवा)
मिळालेल्या माहितीनुसार, आझमगढ जिल्ह्यातील अहरौला पोलीस स्टेशन हद्दीतील गौरी का पुरा गावात रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत एका तरुणीचा मृतदेह १५ नोव्हेंबर रोजी आढळून आला होता. या मृतदेहाचेही अनेक तुकडे करण्यात आले होते. पोलिसांनी तरूणीची ओळख पटवून तिच्या नातेवाईकांची आणि मित्रांची चौकशी सुरू केली, त्यानंतर हे प्रकरण आणि हत्येचे रहस्य समोर आले आणि आरोपीचा तपास सुरू होऊन त्याला अटक करण्यात आली.
Join Our WhatsApp Community