पुण्यात संपूर्ण जून महिन्यात ४३ रुग्णांना बीए व्हेरिएंटची बाधा झाल्याचे उघडकीस आले. पुण्यात या आठवड्यात सलग दुस-यांदा मोठ्या संख्येने बीए व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या समोर आली आहे. वाढत्या बीए व्हेरिएंटच्या प्रादुर्भावर शास्त्रीय आढावा घेत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्टीकरण दिले.
३१ मे ते ३० जून दरम्यान बीए ४ चे ३१, तर बीए २.७५ व्हेरिएंटचे ८ रुग्ण सापडले. ही माहिती पुणे आणि मुंबई येथील इन्साकॉग अंतर्गत प्रयोगशाळेतील अहवालानंतर आरोग्य विभागासमोर उघडकीस आली. या रुग्णांच्या सद्यस्थितीबाबत आरोग्य विभागाने माहिती दिली नाही. परंतु पुण्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुण्यात आतापर्यंत बीए ४ आणि ५ व्हेरिएंटचे ६५, बीए २.७५ व्हेरिएंटचे २० रुग्ण सापडल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. त्या तुलनेत राज्यातील इतर भागांत बीए व्हेरिएंटचा फैलाव फारच कमी आढळला आहे. राज्याभरात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्याही पुण्यातच जास्त आहे. पुण्यात आता ५ हजार ६३३ कोरोना रुग्णांना उपचार दिले जात आहेत.
(हेही वाचा सत्तांतरानंतर अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्याचा अल्बम ‘तेरे बिन अब तो सनम…’)
बीए व्हेरिएंट आढळून आलेले इतर जिल्हे
- बीए ४ आणि ५ व्हेरिेएंट – मुंबई ३३, नागपूर, पुणे, पालघर – प्रत्येकी ४, रायगड ३
- बीए २.७५ – नागपूरात १४, अकोल्यात ४, ठाणे व यवतमाळमध्ये प्रत्येकी १
८ कोरोनाबाधितांचा मृत्यू
राज्यात कोरोनाची चौथी लाट नसतानाही सातत्याने मृत्यूची संख्या आता वाढत आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत, उल्हासनगर, सिंधुदुर्गात प्रत्येकी १, मीरा-भाईंदरमध्ये ३, साता-यात दोन रुग्णांचा कोरोनाचे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली
राज्यात शनिवारी, १६ जुलै रोजी २ हजार ३८२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या २४ तासांत २ हजार ८५३ कोरोना रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले. राज्यात आता १५ हजार ५२१ कोरोना रुग्णांवर उपचार दिले जात असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
Join Our WhatsApp Community