पुण्यात रविवारी बीए व्हेरिएंटच्या नव्या रुग्णांची विक्रमी नोंद झाली. पुण्यात बीए ५ व्हेरिएंटचे ५, बीए व्हेरिएंटचे १०, तर बीए व्हेरिएंट २.७५ चे ७१ रुग्ण सापडले. पुण्यात रविवारच्या नोंदीत ८६ रुग्ण सापडले. त्याखालोखाल सोलापुरात बीए २.७५ व्हेरिएंटचे ८ रुग्ण सापडले. आता राज्यात बीए व्हेरिएंट ४ आणि ५ च्या रुग्णांची संख्या २५८ तर बीए व्हेरिएंट २.७५ ची संख्या १९९वर पोहोचली आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्क्यांवर कायम
गेल्या आठवड्यापासून दैनंदिन मृत्यूच्या नोंदीत झालेली घट रविवारीही कायम दिसून आली. रविवारी ३ कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुंबईत २ तर रत्नागिरीत एक रुग्ण मृत्यू पावला. रविवारी राज्यात १ हजार ८४९ नवे कोरोनाचे रुग्ण दिसून आले. गेल्या २४ तासात १ हजार ८५३ रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्क्यांवर कायम आहे. राज्यात आता १३ हजार ३ रुग्णांना कोरोनावर उपचार उपचार दिले जात आहे.
(हेही वाचा सकाळी ७.३० ते दुपारी ३.३० : काय घडले संजय राऊतांच्या बंगल्यात?)
जिल्हानिहाय बीए ४ आणि ५ रुग्णांची संख्या
पुणे – १६३, मुंबई – ५९, ठाणे – १६, रायगड – ७, सांगली – ५, नागपूर – ८, पालघर – ४, कोल्हापूर – २
जिल्हानिहाय बीए २.७५ रुग्णांची संख्या
पुणे – १२७, नागपूर – ३३, यवतमाळ – १२, सोलापूर – ८, मुंबई – ५, अकोला – ४, ठाणे – ३, वाशीम – २, अमरावती, बुलढाणा, जालना, लातूर, सांगली – प्रत्येकी एक रुग्ण
Join Our WhatsApp Community