अमरनाथ यात्रा 30 जूनपासून होणार सुरू, यात्रेला जायचंय? असं करा रजिस्ट्रेशन

164

अमरनाथ यात्रेला शिवभक्तांसाठी खूप महत्त्व आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून ही यात्रा बंद होती, मात्र यावेळी भाविकांना पुन्हा एकदा अमरनाथ यात्रेला जाता येणार आहे. अमरनाथ यात्रा उन्हाळ्यात काही दिवसांसाठीच सुरू होते. समुद्रसपाटीपासून 12,756 फूट उंचीवर असलेली अमरनाथ गुहा बहुतेक वेळा बर्फाच्या चादरीने झाकलेली असते. अमरनाथ गुहेत दरवर्षी नैसर्गिक पद्धतीने बर्फाचे शिवलिंग तयार होते, ज्यासाठी जगभरातून भाविकांची गर्दी जमते. यंदा अमरनाथ यात्रा 30 जून ते 11 ऑगस्टदरम्यान होणार आहे. सध्या प्रशासनाकडून या यात्रेची जय्यत तयारी सुरू असून यात्रेकरूंच्या सोयीसाठी प्रशासनाकडून प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींची योग्य ती काळजी घेतली जात आहे. तुम्हाला देखील अमरनाथ यात्रेला जायचंय…तर असे करा रजिस्ट्रेशन

अमरनाथ यात्रेला जाण्यासाठी…

श्री अमरनाथ यात्रा 2022 साठी 13 ते 75 वर्षे वयोगटातील व्यक्ती आणि 6 आठवड्यांपेक्षा कमी गर्भवती महिला नोंदणी करू शकतात. या यात्रेची नोंदणी 11 एप्रिलपासून सुरू झाली आहे. ही संपूर्ण यात्रा 43 दिवसांची असणार आहे. यादरम्यान भाविकांना कोरोना नियमावलीचे पालन करावे लागणार आहे.

  • यात्रेची सुरुवात – 30 जून 2022
  • यात्रेची समाप्ती – 11 ऑगस्ट 2022

अशी करा नोंदणी

  1. अमरनाथ यात्रेसाठी ऑनलाइन नोंदणीसाठी, अमरनाथ श्राइन बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट, Shriamarnathjishrine.com ला भेट द्या. त्यानंतर तुम्हाला होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला रजिस्टर ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
  2. क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल, जिथे तुम्हाला तळाशी असलेल्या I Agree पर्यायावर टीक करावी लागेल, त्यानंतर तुम्हाला Register या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  3. आता तुमच्या समोर नोंदणी फॉर्म ओपन होईल. ज्यामध्ये तुम्हाला तुमचे सर्व तपशील भरावे लागतील.
  4. तपशील भरल्यानंतर, तुम्हाला सबमिट या बटणावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमची नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण होईल.

यात्रेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • अमरनाथ यात्रा 2022 मध्ये नोंदणीसाठी, प्रथम तुम्हाला एक अर्ज भरावा लागेल.
  • आरोग्य प्रमाणपत्र, आधार कार्ड
  • चार पासपोर्ट साइज फोटो

अमरनाथ यात्रा नोंदणी शुल्क

ज्या भाविकांना अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी करायची आहे ते पंजाब नॅशनल बँक, जम्मू आणि काश्मीर बँक, येस बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या १०० शाखांना भेट देऊ शकतात. यात्रेसाठी नोंदणी शुल्कात वाढ करण्यात आली आहे. नोंदणी शुल्क पूर्वी १०० रुपये होते ते आता १२० रुपये करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.