पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमची वासनांधता; सह खेळाडूंच्या बायकांवर ठेवतो डोळा

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमचा अश्लील व्हिडिओ सध्या सर्व सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे बाबर आझमच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून एका तरुणीने बाबर आझमवर फसवणुकीचे आरोप केले आहेत. ईशा राजपूत नावाच्या हॅंडलवरून हे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले आणि संपूर्ण क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली. हे फोटो-व्हिडिओ शेअर करून कॅप्शनमध्ये तुमने जो किया, तुमको वही मिला असे लिहिण्यात आले आहे.

( हेही वाचा : १३ किलो गांजासह महिलेला अटक; नागपूर पोलिसांची मोठी कारवाई )

नेमके प्रकरण काय आहे?

बाबर आझम सध्या खराब फॉर्ममुळे चर्चेचा विषय ठरत होता. यासोबतच आता बाबर आझमचा वैयक्तिक व्हिडिओ लिक झाल्यामुळे त्याच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. या व्हिडिओमध्ये तो त्याचाच संघातील खेळाडूंच्या गर्लफ्रेंडला त्याच्याशी संबंध ठेवण्यास सांगत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि फोटोंनुसार बाबर आझमचे अनेक खेळांडूंच्या गर्लफ्रेंडसोबक अवैध संबंध आहेत. यात तू माझ्याशी संबंध ठेवलेस तर मी तुझ्या प्रियकराला संघातून काढून टाकणार नाही अशाप्रकारे ब्लॅकमेल बाबर आझम करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

इन्स्टाग्राम युझरनेम eish.arajput1 आणि ट्विटर अकाऊंट @niiravmodi या अकाऊंटवरून हे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. याबाबत बाबर आझमकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here