बबिता कुमारी फोगाट (Babita Kumari Phogat) एक भारतीय कुस्तीपटू आहे, जिने २०१४ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते आणि भारतीयांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. तिने २०१८ कॉमनवेल्थ गेम्स आणि २०१० कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्य पदक आणि २०१२ वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकले होते. बबिता फोगाटने २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.
बबिता आणि गीता फोगाटवर (Babita Kumari Phogat) आमीर खानने दंगल चित्रपट बनवला होता. बबिता ही फोगाट कुटुंबातील दुसरी मुलगी आहे. बबिता कुमारी फोगाटचा जन्म २० नोव्हेंबर १९८९ रोजी हरियाणामधील बलाली गावात झाला. ती हिंदू जाट कुटुंबातील आहे. बबिता कुमारीच्या वडिलांचे नाव महावीर सिंग फोगाट आहे. महावीर सिंग फोगट हे भारतीय कुस्तीपटू आणि वरिष्ठ ऑलिम्पिक प्रशिक्षक आहेत. गीता फोगट, रितू फोगट आणि संगीता फोगट अशी तिच्या बहिणींची नावे आहेत.
(हेही वाचा Mumbai Hawkers : फेरीवाल्यांमुळे महापालिकेचा ‘बाजार’ उठण्याची वेळ)
बबिताने (Babita Kumari Phogat) तिने २००९ मध्ये तिच्या कुस्ती कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेतून केली. या स्पर्धेत तिने महिला गटात ५१ किलो फ्रीस्टाइल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. ती ५३-५५ किलो गटातील देशातील अव्वल कुस्तीपटूंपैकी एक आहे आणि आंतरराष्ट्रीय मैदानात तिने उत्कृष्ट कामगिरी केली होती.
एका मुलाखतीदरम्यान बिताने सांगितले की, तिच्या गावातील परिस्थिती खूपच वाईट आहे आणि तिची आई व इतर महिलाही बर्याच काळापासून डोक्यावर घुंघट म्हणजे पदर घेतात. फोगाट बहिणी जेव्हा प्रसिद्ध झाल्या तेव्हा त्यांनी त्यांच्या आईला घुंघट हटवण्यास सांगितले. पण त्यांच्या गावातील इतर कोणत्याही महिलेमध्ये असे करण्याची हिंमत नव्हती.
Join Our WhatsApp Community