“बाबरी मशीद नहीं भुलेंगे”, PFI च्या कार्यकर्त्यांकडून जप्त केलेल्या साहित्यातून धक्कादायक माहिती उघड

97

भारतीय तपास यंत्रणांनी औरंगाबाद येथून ताब्यात घेतलेल्या पीएफआयच्या कार्यकर्त्यांकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. औरंगाबादला धर्मांधतेचे हब आणि भारताला इस्लामिक राष्ट्र करण्याचा कट पीएफआयकडून रचण्यात आला होता. यासाठी पीएफआयच्या सदस्यांचे विद्रोही पुस्तकाच्या माध्यमातून ब्रेन वाॅश करण्यात येत होते. तर एटीएसने ताब्यात घेतलेल्या पीएफआयच्या कार्यकर्त्यांकडून बाबरी मशीद नही भुलेंगे लिहिलेले साहित्य सापडले आहे. दरम्यान, अटकेत असलेल्या पीएफआय कार्यकर्त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडीची मुदत वाढवून दिली आहे.

औरंगाबादला बनवायचे होते धर्मांधतेचे हब 

औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आलेल्या पीएफआय कार्यकर्त्यांमध्ये इरफान मल्ली हा संघटनेच्या राज्य कमिटीचा सदस्य म्हणून काम करत होता. एटीएसने त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या घरात एक तलवार सापडली आहे. तर त्याने असे शस्त्र अनेकांना वाटल्याचा संशय एटीएसला आहे. सोबतच त्याच्याकडे पीएफआयचे पब्लिकेशन सापडले असून, ज्यात बाबरी मशीद नही भुलेंगे लिहिलेले साहित्य सापडले आहे. विशेष म्हणजे इरफान एक खासगी मदरसा चालवत होता आणि तिथेच तो जिहादी शिक्षण देत असल्याचा एटीएसला संशय आहे. त्यामुळे त्याच्याकडे कुणी शिक्षण घेतले त्यांची पार्श्वभूमीसुद्धा एटीएसकडून तपासली जाणार आहे.

( हेही वाचा:  PFI Latest Update: शारीरिक प्रशिक्षणाच्या नावाखाली दहशतवादाचे प्रशिक्षण; PFI चा मोठा कट उघडकीस )

पाचही आरोपींविरोधात देशविघातक कृत्यांचे पुरावे

औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आलेल्या शेख इरफान मल्ली, सय्यद फैजल, परवेज खान, अब्दुल हबीब, नासेर शेख यांच्याविरोधात देशविघातक कृत्यांच्या नियोजनाच्यादृष्टीने सबळ पुरावे असल्याची माहिती एटीएसने न्यायालयात दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.