बाबू गुलाबराय (Babu Gulab Rai) यांचा जन्म उत्तर प्रदेशातील इटावा येथे १७ जानेवारी १८८८ रोजी झाला. त्यांचे वडील श्री भवानीप्रसाद हे धार्मिक स्वभावाचे होते. त्यांची आई देखील कृष्णाची उपासक होती आणि ती कबीरांचे श्लोक गात असे. आई-वडिलांच्या या धार्मिक वृत्तीचा परिणाय बाबू गुलाबराय यांच्या झाला.
गुलाबराय (Babu Gulab Rai) यांचे प्राथमिक शिक्षण मैनपुरी येथे झाले. तहसील शाळेनंतर इंग्रजी शिक्षणासाठी ते जिल्ह्याच्या शाळेत गेले. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी आग्रा कॉलेजमधून बीए केले. पुढे तत्वज्ञानात एम.ए परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर गुलाबराय छतरपूरला गेले आणि तेथील महाराजांचे स्वीय सचिव झाले. यानंतर त्यांनी तेथे दिवाण व मुख्य न्यायाधीश म्हणूनही काम पाहिले.
छतरपूर महाराजांच्या मृत्यूनंतर गुलाबराय (Babu Gulab Rai) तेथून निवृत्त होऊन आग्रा येथे राहायला आले. आग्रा येथे आल्यानंतर त्यांनी सेंट जॉन्स येथे हिंदी विभागाचे प्रमुख म्हणून काम केले. त्याचबरोबर त्यांनी साहित्य साधना देखील केली. आधुनिक युगातील निबंधकार आणि समीक्षकांमध्ये बाबू गुलाबराय यांचे स्थान खूप मोठे आहे. हिंदीत तत्त्वज्ञानाशी संबंधित निबंध लिहिणारे ते पहिलेच होते. त्यांच्या साहित्यिक सेवेसाठी आग्रा विद्यापीठाने त्यांना डी.लिट. ची पदवी प्रदान केली. १९६३ मध्ये आग्रा येथे त्यांचे निधन झाले.
Join Our WhatsApp Community