”बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे” या गाण्याद्वारे प्रसिद्धीच्या झोतात आलेला सहदेव दिरदो हा भीषण अपघातात जखमी झाला. या अपघातात सहदेवच्या डोक्याला मार लागला आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सहदेवची प्रकृती आता स्थिर असून त्याला डॉक्टरांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे. सहदेव हा शबरी नगरीच्या दिशेने आपल्या मित्रांबरोबर दुचाकीवरुन जात असताना हा अपघात झाला.
रॅपर बादशाहकडून प्रकृतीची माहिती
प्रसिद्ध रॅपर बादशाह यानेही ट्विटरद्वारे सहदेवसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. तो म्हणाला की, मी सहदेवच्या कुटुंबियांच्या आणि मित्रपरिवाराच्या संपर्कात आहे. अपघातानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मी त्याच्या सोबत आहे. तुमच्या सर्वांच्या प्रार्थनेची गरज आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या सहदेवला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले. दरम्यान त्याच्या गाण्यानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही त्याची भेट घेवून त्याला आशिर्वाद दिेले होते.
(हेही वाचा – नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हा मोतीबिंदू मुक्त करण्याचे ध्येय!)
In touch with Sahdev’s family and friends. He is unconscious, on his way to hospital. Im there for him. Need your prayers 🙏
— BADSHAH (@Its_Badshah) December 28, 2021
कसा झाला अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, सहदेव त्याच्या वडिलांसोबत बाईकवरुन गावी परत येत असताना हा अपघात झाला. बाईकवरुन पडल्यामुळे तो जखमी झाला. सुकमा जिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्याला जगदलपूरमधील मेडिकल कॉलेजमध्ये शिफ्ट करण्यात आले. डोक्याला मोठी दुखापत झाल्यामुळे त्याची शुद्ध हरपल्याची माहिती आहे. सध्या डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर देखरेख करत आहेत.
Join Our WhatsApp Community