देशात खादी उत्पादनांच्या विक्रीत ३३२ टक्क्यांनी वाढ

143
देशात खादी उत्पादनांच्या विक्रीत ३३२ टक्क्यांनी वाढ
देशात खादी उत्पादनांच्या विक्रीत ३३२ टक्क्यांनी वाढ

देशात गेल्या ९ वर्षात ग्रामीण कारागिरींनी बनवलेल्या खादी उत्पादनांच्या विक्रीत ३३२ टक्क्यांची वाढ झाली आहे. भारतात २०१३-१४ या अर्थिक वर्षात खादी व ग्रामोद्योग व्यवसाय ३१,१५४ कोटींचा होता. त्यामध्ये २०२२-२३ या आर्थिक वर्षात वाढ होऊन हा व्यवसाय १,३४,६३० कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी खादीच्या प्रचारासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. परिणामी, खादी उत्पादनांचा व्यवसाय प्रथमच १.३४ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. त्याचप्रमाणे खादी आणि ग्रामोद्योगने ग्रामीण भागात ९,५४,८९९ नवीन नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. यासंदर्भात माहिती देताना खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष म्हणाले की, पंतप्रधानांनी देश-विदेशातील प्रत्येक व्यासपीठावरून खादीचा प्रचार केला. त्यामुळेच खादीच्या लोकप्रियतेत वाढ होऊन खादी उत्पादनांची गणना जगातील सर्वात विश्वासार्ह ब्रँडमध्ये केली जाते. देशात २०१३-१४ ते २०२२-२३ या आर्थिक वर्षात खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांच्या उत्पादनात २६८ टक्के वाढ झाली होती. आताच्या विक्रीने सर्व विक्रम मोडीत काढत ३३२ टक्क्यांपर्यंत मजल मारली. स्थानिक आणि स्वदेशी उत्पादनांसाठी आवाज उठवणाऱ्या मेक इन इंडियावर देशातील लोकांचा विश्वास वाढल्याचे निदर्शनास येते.

(हेही वाचा – हेल्पलाईनवरील केवळ ७० टक्केच कचऱ्याच्या तक्रारी सोडवता आल्या महापालिकेला)

भारतात २०१३-१४ मध्ये खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांचे उत्पादन २६,१०९ कोटी रुपये होते. हा आकडा २०२२-२३ या आर्थिक वर्षात २६८ टक्के वाढीसह ९५९५७ कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या ९ वर्षात खादी कपड्यांच्या उत्पादनात अभूतपूर्व वाढ झाली आहे. खादी कपड्यांचे उत्पादन २०१३-१४ या आर्थिक वर्षात ८११ कोटी रुपये होते. उत्पादनात २०२२-२३ या आर्थिक वर्षात २६० टक्क्यांची वाढ होऊन २९१६ कोटी रुपयांचा आकडा गाठला. ही आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. खादी कपड्यांची मागणीही झपाट्याने वाढली आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षात जिथे तिची विक्री केवळ १०८१ कोटी रुपये होती, तिथे २०२२-२३ या आर्थिक वर्षात ४५० टक्क्यांच्या वाढीसह ती ५९४३ कोटींवर पोहोचली. कोविड-१९ नंतर जगभरात ऑर्गेनिक कपड्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे खादी कपड्यांची मागणीही झपाट्याने वाढत आहे.

खादीमुळे ग्रामीण भागात जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यातही यश आले आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षात ५,६२,५२१ नवीन नोकऱ्यांची निर्मिती झाली होती, तर २०२२-२३ या आर्थिक वर्षात ती ७० टक्क्यांनी वाढून ९,५४,८९९ वर पोहोचली आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षापासून त्यांच्या मानधनात १५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. अलीकडेच, १ एप्रिल २०२३ पासून खादी कारागिरांच्या मोबदल्यात ३३ टक्क्यांहून अधिक वाढ करण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.