बैद्यनाथ मिश्रा (Baidyanath Mishra) यांचा जन्म १९२० रोजी खोरधा येथे महादेव मिश्रा आणि मनिका देवी यांच्या घरी झाला. त्यांचा विवाह बसंती मिश्रा यांच्याशी झाला. त्या गृहिणी होत्या आणि त्यांनी कला शाखेत पदव्युत्तर पदवी मिळवली होती. बैद्यनाथ मिश्रा यांना अर्थशास्त्रातील (Economics) त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना २०१२ मध्ये केआयआयटी विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळाली.
(हेही वाचा – Saree Walkathon : मुंबईत होणार साडी वॉकथॉन; केंद्रीय मंत्री दर्शना जरदोश यांनी केला ई-नोंदणी पोर्टलचा शुभारंभ)
थिंक ओडिशा लीडरशिप पुरस्काराने सन्मानित
ओडिशाचे (Odisha) मुख्यमंत्री नवीन पटनायक (Naveen Patnaik) यांनी त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल २०१० मध्ये एआयसीटीईचे अध्यक्ष आणि आयआयटी खरगपूरचे संचालक दामोदर आचार्य यांच्यासमवेत थिंक ओडिशा लीडरशिप पुरस्काराने सन्मानित केले.
तसेच त्यांना नंदीघोष पुरस्कार आणि विशुभ मिलन पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर ओडिया साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना १९९६ मध्ये ओडिशा साहित्य अकादमी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.
(हेही वाचा – MNS : दुकानांवर मराठी पाट्या; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उरले ४ दिवस; मनसेने करून दिली आठवण)
रेवेनशॉ विद्यापिठातून पदवी
मिश्रा यांनी रेवेनशॉ विद्यापिठातून (Ravenshaw University) अर्थशास्त्रातील कला शाखेची पदवी प्राप्त केली, त्यानंतर १९४८ मध्ये अलाहाबाद विद्यापिठातून मास्टर ऑफ आर्ट्सची पदवी प्राप्त केली. विशेष म्हणजे दोन्ही संस्थांमध्ये ते टॉपर होते.
त्यांनी फुलब्राइट शिष्यवृत्तीवर पेनसिल्व्हेनिया विद्यापिठाच्या व्हार्टन स्कूलमधून अर्थशास्त्रात दुसरी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. विशेष म्हणजे तिथे त्यांनी नोबेल पारितोषिक विजेते सायमन कुझनेट्स यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले. भारतात परतल्यानंतर त्यांनी उत्कल विद्यापिठातून पीएचडी केली. (Baidyanath Mishra)
(हेही वाचा – Devendra Fadnavis : फडणवीस, मुनगंटीवारांना ठार करण्याची धमकी देणारा बाबाराव मस्कीविरोधात गुन्हा दाखल)
ओडिशा युनिव्हर्सिटी ऑफ ऍग्रीकल्चर ऍंड टेक्नॉलॉजीचे कुलगुरु
त्यांनी रेवेनशॉ कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी उत्कल विद्यापिठात प्राध्यापक, ऍनालिटिकल ऍंड अप्लाइड इकॉनॉमिक्स विभागाचे प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळला. १९८१ ते १९८५ दरम्यान त्यांनी ओडिशा युनिव्हर्सिटी ऑफ ऍग्रीकल्चर ऍंड टेक्नॉलॉजीचे कुलगुरु म्हणून काम केले. कार्यभार सांभाळतांना त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग ऍंड टेक्नॉलॉजी, भुवनेश्वर आणि कॉलेज ऑफ फिशरीज, गंजम यांची स्थापना केली. (Baidyanath Mishra)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community