सांगली साधू मारहाण प्रकरणी सातही आरोपींना जामीन मंजूर

194

सांगली येथील साधू मारहाण प्रकरणी अटक केलेल्या सातही आरोपींना जत न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दरम्यान या प्रकरणी उमदी पोलिसांनी याप्रकरणी 25 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

(हेही वाचा – गिरगाव चौपाटीची स्वच्छता नौदल ‘काश’ कॉलेज विद्यार्थ्यांसह करेल!)

जत तालुक्यातील लवंगा येथे साधूंना झालेल्या मारहाण प्रकरणी आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली होती. यामध्ये सरपंच पुत्रासह माजी सरपंचाचाही समावेश आहे. पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या चार साधूंना गैरसमजातून मारहाण झाली होती. मारहाणीनंतर साधूंनी तक्रार देण्यास नकार दिला. मात्र मारहाण करणा-यांना परमेश्वर शिक्षा देईल असे सांगून साधू पुढच्या प्रवासाला गेल्याची माहिती समोर आली आहे. या साधूंना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यानंतर 25 जणांवर गुन्हा दाखल तर 7 जणांना अटक करण्यात आली आहे.

कसा घडला प्रकार ? 

वाराणसी इथून चार साधू कर्नाटकात देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन आटोपून ते लवंगामार्गे विजापूरला जात होते. त्यावेळी रस्त्यात गाडी थांबवून विजापूर रस्ता कोणता अशी विचारणा या साधूंनी एका तरुणाकडे केली. मुले पळवणारी चोरांची टोळी असा कन्नडमध्ये उल्लेख असलेला साधूचा एक व्हिडीओ तरुणाने पाहिला होता. त्या तरुणाकडेच या साधूंनी रस्त्याबाबत विचारणा केली. त्यामुळे शंका आल्याने या तरुणाने ही बाब गावात कळवली. त्यानंतर या चारही साधूंना गाडीतून ओढून बेदम मारहाण करण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.