ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मंगळागौर कार्यक्रमात मिसेस मुख्यमंत्री लता एकनाथ शिंदे उत्साहाने सहभागी झाल्या. घरातील नवरा, मुले आणि इतर कुटुंबियांची जबाबदारी, त्याच्या सोबतीला नोकरी-व्यवसाय, हे केवळ बाईच करू शकते. त्यामुळे बाईपण खरोखरच भारी असते,(Baipan Bhari Deva) असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
ठाणे महानगरपालिकेतील नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापालिकेतील महिला अधिकारी व कर्मचारी यांनी मंगळागौर कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात मिसेस मुख्यमंत्र्यांनी देखील सहभाग घेत महिलांचा उत्साह वाढवला. तसेच या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिला कर्मचाऱ्यांशी संवाद देखील साधला. (Baipan Bhari Deva)
घरातील नवरा, मुले आणि इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या आपण साऱ्या पार पाडत असतो. मात्र आज या साऱ्या जबाबदाऱ्या काही वेळासाठी बाजूला सारून थोडा वेळ स्वतःसाठी काढून या खेळात सहभागी झालो आहोत. तुम्हा सगळ्या जणींचा उत्साह हा निश्चितच आनंददायक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
(हेही वाचा-Dr. Swaminathan : स्वामीनाथन यांच्या निधनाने शेतकऱ्यांसाठी आयुष्य वेचलेला सुपुत्र गमावला – मुख्यमंत्री)
ठाणे महानगरपालिकेतील महिलांनी सादर केलेल्या बाईपण भारी देवा… (Baipan Bhari Deva) या सिनेमातील गाण्यावरील सादरीकरण पाहून त्या आनंदी झाल्या. आपण बायका खरोखरच भारी असतो आणि तुमचा डान्स पाहून मला त्याची पुन्हा एकदा खात्री पटल्याचे त्यांनी सर्व महिलांना सांगितले. तसेच या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आणि त्यासाठी आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून बोलावल्याबद्दल त्यांनी ठाणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱी यांचेही आभार मानले.
यावेळी माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी नगरसेविका नम्रता भोसले-जाधव, अतिरीक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिलारी, मिनल पालांडे, श्रीमती वर्षा दिक्षीत, अनघा कदम यांच्यासह शिवसेनेच्या अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
Join Our WhatsApp Community