Sagar Giri : बजरंग दलाचे कार्यकर्ते सागर अशोक गिरी यांच्या निधनामुळे माझगाव अंजीरवाडी परिसरात पसरली शोककळा

सागर (Sagar Giri) हे हिंदू धर्माभिमानी होते. ते बजरंग दलाशी संबंधित होते. त्यांच्या प्रति परिसरातील नागरिकांमध्ये खूप आदरभाव होता. सागर गिरी हे सामाजिक कार्यातही हिरीरीने सहभाग घेत असत.

193
मुंबईतील भायखळा, अंजीरवाडी येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते, प्रखर हिंदुत्वनिष्ठ सागर अशोक गिरी (Sagar Giri) यांचे गुरुवार, ३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मित निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रे रोडवरील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. एका होतकरू देशभक्त युवकाच्या आकस्मित निधनाने भायखळा, माझगाव परिसरात शोककळा पसरली. त्यांच्या अंत्यसंस्काराला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

नागरिकांमध्ये होता आदरभाव 

सागर (Sagar Giri) हे भायखळा येथील अंजीरवाडी येथे कुटुंबासह राहत होते. सागर यांच्या पश्चात आई-वडिलांसह त्यांची पत्नी आणि बहीण सखी गिरी असा परिवार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते. सागर (Sagar Giri) हे हिंदू धर्माभिमानी होते. ते बजरंग दलाशी संबंधित होते. त्यांच्या प्रति परिसरातील नागरिकांमध्ये खूप आदरभाव होता. सागर गिरी हे सामाजिक कार्यातही हिरीरीने सहभाग घेत असत.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी सागर अशोक गिरी (Sagar Giri) यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, सागर हे सामाजिकभान असलेले हिंदुत्वनिष्ठ, देशभक्त तरुण होते. त्यांच्या निधनाने समाजाची मोठी हानी झाली आहे. देव त्यांच्या कुटुंबीयांना हे डोंगरा इतके दुख: सहन करण्याची शक्ती देवो.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.