वीर सावरकरांच्या ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ ग्रंथाचे भगतसिंगांनी केले होते पुनर्प्रकाशन   

139

वीर सावरकर हे कट्टर स्वातंत्र्यसैनिक होते, ते सशस्त्र क्रांतीवीरच विश्वास ठेवत होते. ‘रणाविना स्वातंत्र्य कुणा मिळेना’, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर शस्त्रनीती अवलंबवावी लागेल, असे ते म्हणत. ब्रिटिशांना केवळ आवेदन पत्रे लिहून थोडे यश मिळेल, पण संपूर्ण स्वातंत्र्य मिळवायचे असेल, तर शस्त्रपूजा करावीच लागेल. म्हणून त्यांनी लंडनमध्ये पहिला ग्रंथ लिहिला, ज्याचे नाव १८५७चे स्वातंत्र्यसमर हे होते. त्याचा प्रभाव क्रांतीकारकांच्या पुढील पिढीवर पडला. क्रांतीकारक भगतसिंग यांनी त्यांच्या सहकार्यासाठी त्या पुस्तकाचे पुनर्प्रकाशन केले. ब्रिटिशांनी जेव्हा भगतसिंग यांची झडती घेतली, तेव्हा त्यांच्याकडे हा ग्रंथ सापडला. हा ग्रंथाचे महत्व आझाद हिंद सेनेचे संस्थापक सुभाष चंद्र बोस यांच्यापर्यंत पोहचले होते. य.दी. फडके जे विचाराने हिंदुत्ववादी विचारांचे नव्हते, त्यांनीही १८५७चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथाविषयी लिहिताना म्हटले की, हा ग्रंथ लिहिताना ब्रिटिशांकडील दस्तऐवज पडताळण्यात आला, अशी महत्वपूर्ण माहिती इतिहासकार आणि वीर सावरकर साहित्याचे सखोल अभ्यासक चंद्रशेखर साने यांनी दिली.

क्रांतीकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी देशासाठी प्राणार्पण केले, तो 23 मार्च हा बलिदान दिन म्हणून ओळखला जातो. या निमित्ताने स्वातंत्र्य चळवळीतील दोन प्रणेते वीर सावरकर आणि भगतसिंग यांच्यात किती वैचारिक साम्य होते, हे तथ्यांसह इतिहासकार आणि वीर सावरकर साहित्याचे अभ्यासक चंद्रशेखर साने यांनी त्यांच्या मुलाखतीत स्पष्ट केले. ‘हिंदुस्थान पोस्ट’चे सहयोगी संपादक करुणाशंकर तिवारी यांनी त्यांची यानिमित्ताने मुलाखत घेतली.

भगतसिंग यांनी ‘या’ शब्दांत केलेले वीर सावरकरांचे वर्णन

वीर सावरकर यांच्याविषयी भगतसिंग लिहितात, ‘विश्वप्रेमी तो वीर आहे, ज्याला कट्टर क्रांतिकारकी, भीषण अराज्यवादी म्हणायला आम्ही जरादेखील लाजत नाही, तेच वीर सावरकर, विश्व लाटांवरून गवतावर चालता चालता कोवळे गवत पायाखाली चिरडणार नाही ना, म्हणून ते थांबत.’ याचा अर्थ वीर सावरकर हे विश्वप्रेमी आहेत, तसेच ते मानवतावादीही आहेत’, असा अर्थ यातून अभिप्रेत होत आहे. भगतसिंग यांनी इतके खोलवर वीर सावरकर यांना ओळखले होते, असेही साने म्हणाले.

वीर सावरकर रत्नागिरीत स्थानबद्ध असूनही भगतसिंग होते संपर्कात

वीर सावरकर हे रत्नागिरीत स्थानबद्धतेत होते, मात्र वीर सावरकर यांचे बंधू बाबाराव सावरकर हे स्थानबद्ध नव्हते. ते भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना भेटत असत आणि त्यांना मार्गदर्शन करत असत. तसेच वीर सावरकर जे लिहीत ते बाबाराव सावरकर यांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहचत असत. अंदमानातील कारागृहात बंदिस्त क्रांतीकारकांच्या सुटकेसाठी वीर सावरकर यांनी ब्रिटिशांना आवेदन केले होते, हे भगतसिंग यांना माहित होते, वीर सावरकर यांनीही त्याचा उल्लेख माझी जन्मठेप या ग्रंथात केला आहे, त्यामुळेच याची माहिती सर्वांना झाली. वीर सावरकर यांना ६ जानेवारी १९२४ रोजी रत्नागिरीत स्थानबद्ध केले होते. त्यानंतर १४ जानेवारी १९२४ रोजी बॉम्बे क्रोनिकल या काँग्रेसी विचारांच्या वृत्तपत्रात म्हटले होते की, जर वीर सावरकर यांनी म्हटले होते की, ते आता राजकारणात सहभागी न होता विधायक कार्यात सहभागी होतील, तर मग त्यांच्यावर इतके प्रतिबंध का लावण्यात आले?, असे विचार मांडले होते. तरीही १९२९ मध्ये भगतसिंग यांनी वीर सावरकर यांचे वर्णन उपरोक्तप्रमाणे तेजस्वी शब्दांत केले होते, यावरून भगतसिंग जाणून होते की, वीर सावरकर देशकार्यात सहभागी असणारच. म्हणूनच वीर सावरकर रत्नागिरीत होते, तरीही भगतसिंग हे वीर सावरकर यांच्या संपर्कात राहिले, असेही साने म्हणाले.

वीर सावरकर आणि भगतसिंगांचे राष्ट्रीयत्वावरील विचार होते समान

हे सर्व प्रमाणबध्द तथ्य पाहिल्यास वीर सावरकर आणि भगतसिंग हे निराळ्या विचारधारेचे होते, असे म्हणणे व्यर्थ ठरते. भगतसिंग यांचे मित्र राजगुरु हे स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. स्वतः य.दी. फडके यांनी तसा उल्लेख केला आहे. ‘राजगुरु हे कायम बाबाराव सावरकर यांना भेटत असत. राजगुरू हे संघ शाखेत जात असत’, असे फडके यांनी म्हटले आहे. भगतसिंग हे हिंदुत्ववादी होते असे मी म्हणत नाही, पण म्हणून त्यांची हिंदुत्वविरोधी विचारधारा होती असेही मी म्हणणार नाही. कारण भगतसिंग यांनी देशभरातील साहित्यिकांचे विचार आपल्या लिखाणात घेतले आहेत, त्यात वीर सावरकर यांच्या ग्रंथातील ६ परिच्छेद घेतलेले आहेत. त्यात साहित्यिक आणि सांस्कृतिक विचारांचा समावेश होता. भगतसिंग स्वतः लिहितात की, ‘भारतीय मुसलमान हे राष्ट्रीयत्वाच्या विचारापासून दूर आहेत. त्यामुळे ते पंजाबी किंवा हिंदी भाषा सोडून फारसी किंवा उर्दू भाषेचा आग्रह धरत आहेत. हे धर्मनिरपेक्षतेचे दर्शन घडवत नाही.’ भगतसिंग यांचे हे विचार वीर सावरकर यांच्या विचारांशी तंतोतंत जुळतात. यावरून भगतसिंग हे वीर सावरकर यांच्याप्रमाणे एक राष्ट्र एक भाषा यासाठी आग्रही होते. मुस्लिमांमध्ये भारतीयत्वाचा, राष्ट्रीयत्वाच्या संपूर्ण अभाव आहे,  इथल्या मुस्लिमांनी उर्दूला स्वीकारले आहे. ते अखिल भारतात राष्ट्रीयत्वाचे महत्व समजून घेत नाही, असे भगतसिंग म्हणाले आहेत, असे सांगत साने यांनी वीर सावरकर आणि भगतसिंग यांचे राष्ट्रीयत्वावरील विचारही समान होते हे स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.