मुंबईतील शाळा कॉलेजच्या बाहेर बसणाऱ्या फेरीवाल्यांवर मुंबई पोलीस आयुक्तांनी बंदी घातली आहे. शाळेच्या १०० मीटर आवारात फेरीवाल्यांना बसू देऊ नये, किंवा स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार करावी असे आवाहन पोलीस आयुक संजय पांडे यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून शाळा प्रशासनाला केले आहे.
फेरीवाल्यांवर बंदी
शाळा सुरू होण्यासाठी काही दिवस उरलेले असताना मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी फेरीवाला मुक्त शाळा – महाविद्यालये हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. शाळा – कॉलेज परिसरात असणाऱ्या फेरीवाल्याकडे असणारे खाद्य पदार्थ असल्यामुळे ते खाण्यास योग्य नसतात, त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडू शकते. मधल्या सुट्टीत किंवा शाळा सुटल्यावर विद्यार्थी सर्रासपणे शाळेजवळ असणाऱ्या फेरीवाल्यांकडून उघड्यावरील पदार्थ घेऊन खातात यामुळे विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडू शकते.
( हेही वाचा : ‘बेस्ट’मध्ये ९० महिला वाहकांची भरती)
शाळा -महाविद्यालय पासून १०० मीटर अंतराच्या आत फेरीवाल्यांना बसू देऊ नका, त्यांना तेथून हाकलून लावा फेरीवाले ऐकत नसतील तर नजीकच्या पोलीस ठाण्याची मदत घ्या असे आवाहन पोलीस आयुक्त पांडे यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून शाळा प्रशासनाला केले आहे.