मुंबई पोलिसांनी लाऊडस्पीकर संदर्भात नुकताच मोठा निर्णय घेतला आहे. सायलेंट झोनमध्ये कोणालाही लाऊडस्पीकर, भोंगे लावण्याची परवानगी नसेल. याशिवाय रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत मुंबईसह संपूर्ण उपनगरात लाऊडस्पीकर किंवा भोंगे वाजवणाऱ्यावर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.
धार्मिक स्थळ असो किंवा कुठलाही खाजगी कार्यक्रम असो त्यासाठी लाऊडस्पीकर वाजवण्यावर बंदी असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषनावर दिलेल्या आदेशाची मुंबई पोलिसांकडून आता अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई पोलिसांकडून प्रत्येक पोलीस ठाण्यात एक पथक तयार करण्यात येणार आहे. मुख्य नियंत्रण कक्षाला यासंदर्भात कॉल येताच संबंधित पोलीस ठाण्याला कळविण्यात येईल आणि संबंधित पथक त्याठिकाणी जाऊन कारवाई करतील अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
( हेही वाचा : सदावर्तेंवरील पोलीस कारवाईमुळे जे. जे. मधील १२२ कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढल्या )
बेकायदेशीर लाऊडस्पीकर आणि उल्लंघन करणार्यांवर महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम ३३ (डब्लू) आणि १३५ सह सर्व विद्यमान नियमांनुसार कारवाई केली जाईल, ज्या अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणारे लाऊडस्पीकर जप्त केले जातील आणि १२ हजार रुपयांच्या दंडाची तरतूदही करण्यात आली आहे.
परवानगी कोणाला मिळणार …
मुंबई पोलीस रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत ध्वनिप्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करतील अशाच मंदिर आणि मशिदींमध्ये लाऊडस्पीकरला परवानगी दिली जाईल.
ज्या धार्मिक संस्था सायलेंट झोनमध्ये नाहीत त्यांनाच लाऊडस्पीकरला परवानगी दिली जाईल.
तसेच लाऊडस्पीकरची परवानगी घेणारी मशीद किंवा मंदिराची रचना कायदेशीर आहे की नाही हे देखील पाहिले जाईल.
Join Our WhatsApp Community