विसर्जनानंतर पाण्यात तरंगणाऱ्या मूर्तींचे फोटो, व्हिडीओ काढण्यास बंदी

101

नवरात्र उत्सवाच्या मूर्ती विसर्जनानंतर पाण्यात वाहून न गेलेल्या देवी मूर्तींचे छायाचित्र काढून त्याचा प्रसार होतो. यामुळे जनमानसाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात. अशा मूर्तींचे छायाचित्र व चलचित्र काढण्यास बंदीचे आदेश आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुंबईचे पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी दिली.

( हेही वाचा : नाशिकमध्ये ई-बाईकने घेतला पेट!)

मूर्तींचे छायाचित्र व चलचित्र काढण्यास बंदीचे आदेश

मुंबईमध्ये होणाऱ्या देवी मूर्तीच्या विसर्जनानंतर अर्धवट विरघळलेल्या मूर्ती भरतीच्या वेळी किनाऱ्यावर वाहून येतात किंवा तरंगतात. या मूर्ती महानगरपालिकेचे कर्मचारी गोळा करतात. ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान विसर्जनाच्या प्रसंगाचे छायाचित्र काढणे, चलचित्र काढणे, प्रकाशित करणे आणि प्रसारित करण्यास बंदीचे आदेश आहेत. कलम १४४ अन्वये विशेष अधिकारान्वये पोलीस उप आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत. नमुद कालावधीनंतर आवश्यक असल्यास यासंदर्भातील आदेशाची अंमलबजावणी केली जाऊ शकते, असेही सांगण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.