१० ऑगस्टपर्यंत एअर मिसाईल, पॅराग्लाईडर्ससह ड्रोनच्या वापरावर बंदी

राष्ट्रीय हिताला बाधा पोहचविणाऱ्या, तसेच राष्ट्रद्रोही कारवायांसाठी कारणीभूत ठरतील असे घटक जसे एअर मिसाईल, पॅराग्लाईडर्स, रिमोट कंट्रोल, मायक्रोलाईट, एअर क्राफ्ट, ड्रोन यांच्या वापरावर बंदीचे आदेश मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १० ऑगस्ट २०२२ पर्यंत लागू करण्यात आले आहेत.

( हेही वाचा : ओबीसी आरक्षण : १३ महानगरपालिकांसाठी नव्याने सोडत काढणार)

१० ऑगस्टपर्यंत एअर मिसाईल, पॅराग्लाईडर्ससह ड्रोनच्या वापरावर बंदी

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, सामान्य जनतेला धोका उत्पन्न होणार नाही, अति महत्त्वाच्या व्यक्तींना धोका निर्माण होणार नाही, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होवू नये याकरीता हे आदेश लागू आहेत. तथापि, ज्यांनी या कालावधीत पूर्व लेखी परवानगी घेतली आहे अशांसाठी हा आदेश शिथिल असेल. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here