वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात! ५ जणांचा मृत्यू; रस्ता वाहतुकीसाठी बंद

165

वांद्रे-वरळी सी लिंकवर ४ ऑक्टोबर मंगळवारी भीषण अपघात झाला होऊन, या अपघातामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांपैकी ३ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पहाटे साडे तीनच्या सुमारास हा अपघात झाला. गाड्या एकमेकांवर आदळल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती सीसीटीव्ही दृष्यांमधून मिळते आहे. यामुळे वांद्रे-वरळी सी लिंक प्रवासासाठी बंद करण्यात आला आहे.

( हेही वाचा : उत्तराखंडमध्ये लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; 25 जणांचा मृत्यू )

५ जणांचा मृत्यू; रस्ता वाहतुकीसाठी बंद

या अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला सुद्धा मागून येणाऱ्या तीन गाड्या धडकल्या. गाड्या पाठोपाठ आदळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान धाले आहे. या अपघातानंतर वरळी सी लिंकवर एकच गोंधळ उडाला. याबाबत अधिक तपासणी पोलिसांकडून सुरू असून सध्या वांद्रे-वरळी सी-लिंक बंद करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.