Bangalore Nagarathnamma : भारतीय शेवटची देवदासी आणि महान गायिका बॅंगलोर नागरथनम्मा यांनी पुरुष सत्तेविरुद्ध केले होते बंड

134
”मी जन्मतः नागरत्न (सापाच्या डोक्यावरचा मौल्यवान रत्न) होते, नंतर भोगरत्न (आनंदाचे रत्न) झाले आणि आता मी रोगरत्न (रोगाचे रत्न) आहे” – अशाप्रकारे बंगळुरू नागरथनम्माने आपल्या शेवटच्या काळी आनंदाने स्वतःचे वर्णन केले आहे. त्यांना रागरत्न (संगीत रागांचे रत्न) आणि त्यागरत्न (त्यागाचे रत्न) असेही म्हटले जाऊ लागले.
बंगलोर नागरथनम्मा (Bangalore Nagarathnamma) यांचा जन्म ३ नोव्हेंबर १८७८ रोजी म्हैसूरजवळील नांजनगुड येथे झाला. आई देवदासी पुत्तुलक्षम्मा आणि वडील वकील सुब्बा राव. त्या एक भारतीय कर्नाटक गायिका, सांस्कृतिक कार्यकर्त्या, विद्वान आणि देवदासी होत्या. नागरथनम्मा यांनी तिरुवैयारू येथे कर्नाटकी गायक त्यागराजाच्या समाधीवर एक मंदिर बांधले आणि त्यांच्या स्मरणार्थ त्यागराज आराधना उत्सवाची स्थापना करण्यास मदत केली. त्यांनी चुकीच्या प्रथेविरुद्ध लढा पुकारला होता. पुरुषी वर्चस्व असलेल्या क्षेत्रात महिला कलाकारांना स्थान नव्हते, त्याविरोधात त्यांनी आवाज उठवला. त्या मद्रास प्रेसिडेन्सीच्या देवदासींच्या संघटनेच्या पहिल्या अध्यक्षा देखील होत्या.
त्या देवदासी समाजाच्या वंशज होत्या आणि भारतातील शेवटच्या देवदासी होत्या. नागरथनम्मा ह्या एक उत्कृष्ट संगीतकार, सांस्कृतिक कार्यकर्त्या, कलांच्या संरक्षक, विद्वान, गणिका, परोपकारी आणि इतिहासकार होत्या. त्यांचे चरित्र अभ्यासता असे लक्षात येते जणू एका स्त्रीमध्ये अनेक आत्मा वास करत आहेत. त्यांना संस्कृत, कन्नड आणि तेलुगू भाषांचे उत्तम ज्ञान होते.
नागरथनम्मा यांनी संस्कृतमध्ये प्राविण्य मिळवलं होतं. त्यांनी तिने कवितांवरील पुस्तके संपादित आणि प्रकाशित केली आहेत. नागरथनम्मा ह्या सर्वोत्तम कर्नाटक गायिका म्हणून उदयास आल्या. नृत्यातील त्यांच्या भारतीय ढंगाच्या प्रतिभेने प्रभावित होऊन म्हैसूरचे तत्कालीन शासक श्री जयचामराजेंद्र वोडेयार यांनी त्यांना म्हैसूरची अस्थाना विदुषी बनवले. म्हैसूर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री. नरहरी राव नेहमी त्यांच्या मैफिलीत उपस्थित असायचे.
पुढे राव यांनी नागरथनम्मा (Bangalore Nagarathnamma) यांना त्यांची संगीताची कारकीर्द घडवण्यात मदत केली. त्यांच्या सूचनेनुसार नागरथनम्मा आपली संगीत प्रतिभा विकसित करण्यासाठी मद्रासला गेल्या. तिथे त्यांनी पुष्कळ नाव कमावले. त्यांची प्रतिभा पाहुन लोक त्यांना “बंगलोर नागरथनम्मा” म्हणू लागले. विशेष म्हणजे त्या मद्रासमधील आयकर भरणार्‍या पहिल्या महिला कलाकार ठरल्या.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.