Bank Manager Salary : बँक मॅनेजरना महिन्याला किती पगार असतो? त्यांच्या जबाबदाऱ्या काय?

88
Bank Manager Salary : बँक मॅनेजरना महिन्याला किती पगार असतो? त्यांच्या जबाबदाऱ्या काय?
Bank Manager Salary : बँक मॅनेजरना महिन्याला किती पगार असतो? त्यांच्या जबाबदाऱ्या काय?
  • ऋजुता लुकतुके

बँक कर्मचाऱ्यांमध्ये एखाद्या शाखेचा व्यवस्थापक किंवा बँक मॅनेजर (Bank Manager Salary) हा सगळ्यात कुशल आणि अर्हताप्राप्त प्रशासकीय अधिकारी असतो. शाखेच्या दैनंदिन कामकाजावर देखरेख ठेवण्याबरोबरच कामांची ग्राहकांचं तक्रार निवारण हे बँक मॅनेजरचं महत्त्वाचं काम आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील मॅनेजरचा पगार हा अर्थातच, केंद्रसरकारच्या नियमांनुसार ठरतो. पण, बँकेची शाखा शहरांत आहे की गावांत, मॅनेजरच्या कामाचं व विभागाचं स्वरुप, कामाचा पूर्वानुभव व शैक्षणिक पात्रता अशा अनेक गोष्टींवर हा पगार अवलंबून असतो. त्यामुळे दोन बँक मॅनेजरना सारखाच पगार असेल असं होणार नाही. पण देशांतील बँक मॅनेजरना मिळणारा सरासरी वार्षिक पगार हा सध्या ७.५९ लाख रुपये इतका आहे.

(हेही वाचा- आता अटल सेतू मार्गावरुन NMMT ची बस धावणार)

बँक मॅनेजरना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता असे विविध भत्तेही मिळतात, जे पगारात समाविष्ट केलेले असतात. बँक मॅनेजर होण्यासाठी तुम्हाला एखाद्या विषयात स्नातक म्हणजे पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तर बँक मॅनेजर पदासाठी नियमितपणे परीक्षा घेतल्या जातात. त्या उत्तीर्ण होणंही महत्त्वाचं आहे. बँक मॅनेजरचा सरासरी मासिक पगार हा ५३,९१४ रुपये इतका आहे. तर एका वर्षापेक्षा कमी अनुभव असलेल्या बँक मॅनेजरचा पगार हा वार्षिक ३.६० लाख रुपये इतका आहे. (Bank Manager Salary)

भारतात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा विचार केला तर सर्वात जास्त पगार हा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँक मॅनेजरला रुपये १०.१७ लाख रुपये इतका मिळतो. तर सर्वात कमी पगार हा रुपये ८.९५ लाख हा पंजाब नॅशनल बँकेच्या बँक मॅनेजरला मिळतो. तुम्ही ज्या विभागात काम करता त्यावरही तुमचा पगार अवलंबून आहे. ऑपरेशन्स विभागात काम करणारा बँक मॅनेजर सर्वाधिक म्हणजे ८.४० लाख रुपये इतका सरासरी वार्षिक पगार घेऊन जातो. तर मनुष्यबळ विकास विभागात काम करणारा बँक मॅनेजर वार्षिक सरासरी ५.०७ लाख रुपये इतका पगार मिळवतो. (Bank Manager Salary)

(हेही वाचा- ऑलिम्पिक खेळांसाठी मोठे योगदान देणारे माजी हॉकीपटू Viren Rasquinha यांच्याविषयी तुम्हाला माहिती आहे का ?)

अनुभवाचा निकष ठेवला तर पाच वर्षांपर्यंतचा कामाचा अनुभव असलेला बँक मॅनेजर सरासरी वार्षिक ६ लाख इतका पगार मिळवतो. तर २० वर्षांहून जास्त अनुभव असलेला अधिकारी सरासरी वार्षिक १६ लाख रुपये मिळवतो. शहरांमध्ये सर्वाधिक पगार हा मुंबई शहरांत आहे. तर सर्वात कमी लखनौ इथं आहे. (Bank Manager Salary)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.