तुम्ही बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. बँक ऑफ बडोदा बँकेत कराराच्या आधारावर रिक्त जागा काढल्या आहेत. या पदांसाठी अर्ज करणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार bankofbaroda.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ नोव्हेंबर २०२२ असून या भरती प्रक्रियेत एकूण ६० रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.
(हेही वाचा – माथेरान मिनी ट्रेन ‘या’ तारखेपासून प्रवाशांच्या सेवेत; पहा संपूर्ण वेळापत्रक)
कोणत्या पदांची होणार भरती
बँक ऑफ बडोदा बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सीनिअर डेव्हलपर फुल स्टॅक जावा पदांसाठी १६ जागा रिक्त जागा आहेत. डेव्हलपर फुल स्टॅक जावा पदांसाठी १३ जागा, डेव्हलपर – फुल स्टॅक डॉट नेट आणि जावाच्या पदांसाठी ६ जागा, याव्यतिरिक्त डेव्हलपर – मोबाइल अॅप्लीकेशन डेव्हलपमेंटसाठी ६ पदं, क्वॉलिटी इन्श्योरंस इंजिनियर्ससाठी ६ पदं, ज्युनिअर क्वॉलिटी इन्श्योरंस इंजिनियर्ससाठी ५ पदांसह एकूण ६० पदांकरता ही भरती असणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
ज्या उमेदवारांना या पदांकरता अर्ज भरायचा आहे, त्या उमेदवारांनी मान्यता प्राप्त उच्च शिक्षण संस्थेतून संगणक विज्ञान किंवा आयटीमध्ये BE/B.Tech पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
किती असणार अर्जाचे शुल्क
उमेदरवारांची निवड ही शॉर्ट लिस्टिंग, थेट मुलाखत आणि इतर निवड पद्धतीने करण्यात येईल. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य, EWS आणि OBC उमेदवारांसाठी अर्जाची फी ६०० रुपये असणार आहे तर SC, ST, PWD आणि महिला उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क असणार आहे.