Bank Strike: ‘या’ दिवशी तुमचे बँकेत काम तर नाही ना? बँक कर्मचाऱ्यांनी दिला संपाचा इशारा

130

सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय संघटनांनी ५ दिवसांचा कामाचा आठवडा आणि निवृत्ती वेतनविषयक मागण्यांसाठी येत्या २७ जूनला संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. कर्मचारी संघटनांनी बुधवारी माहिती दिली की, पाच दिवसांचा आठवडा आणि पेंशन संबधी मुद्द्यांच्या मागणीसाठी बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत.

कोण होणार संपात सहभागी?

या संपामध्ये ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन’च्या (यूएफबीयू) नेतृत्वाखाली ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन (एआयबीओसी), ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (एआयबीईए) आणि नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स (एनओबीडब्ल्यू) यांच्यासह एकूण ९ बँक कर्मचारी संघटनांच्या सदस्यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा – बॅंकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी! IDBI आणि IBPS बॅंकेत बंपर भरती, लगेच भरा अर्ज)

देशभरात ७ लाख कामगार पुकारणार संप!

पेंशनधारकांसाठीच्या पेंशन योजनेत सुधारणा कराव्यात आणि राष्ट्रीय पेंशन योजना रद्द करावी आणि सर्व बँक कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेंशन योजना पूर्ववत करावी, असे एआयबीईएचे महासचिव सी एच वेंकटचलम यांनी युएफबीयूच्या बैठकीनंतर म्हटले आहे. तर देशभरातील सुमारे ७ लाख कामगार या संपात भाग घेतील असे एआयबीओसीचे सरचिटणीस सौम्या दत्ता यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.