कृष्णनगरी मथुरेमध्ये जन्माष्टमी उत्सवावेळी मोठी दुर्घटना घडली आहे. वृदांवन येथील प्रसिद्ध बांके बिहारी मंदिरात जन्माष्टमी उत्सवावेळी दुर्घटना घडली. जन्माष्टमी उत्सवावेळी बांके बिहारी मंदिरात चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन भाविकांचा मृत्यू झाला असून, अनेत भक्तगण जखमी झाले आहेत. बांके बिहारी मंदिरात मंगला आरती दरम्यान, ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मंगला आरतीच्या वेळी चेंगराचेंगरी
वृंदावनमध्ये जन्माष्टमीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. भारतासह जगभरातील भाविक आणि पर्यटक येथे दाखल होत असतात. उत्तर प्रदेशच्या मथुरेमध्ये यंदाही श्रीकृष्ण जन्माचा उत्सव साजरा केला गेला. बांके बिहारी मंदिरात जन्माष्टमीमुळे लाखोंची गर्दी होती. बांके बिहारी मंदिरात पहाटे चार वाजता मंगला आरती केली जाते. जन्माष्टमीवेळी मंगला आरती सुरु असताना, चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना घडली. यामध्ये दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण जखमी झाले आहेत. यंदाही जन्माष्टमीच्या वेळी मथुरा- वृंदावनमधील सर्व हाॅटेल- लाॅज आणि आश्रम भाविकांनी फुललेले पाहायला मिळाले. जन्माष्टमी साजरी करण्यासाठी लाखो लोक आले होते.
( हेही वाचा: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! थेट मुलाखतीद्वारे केली जाणार निवड; या ठिकाणी पाठवा अर्ज )
Join Our WhatsApp Community