बँकांची कामं लवकर उरका! येत्या १० दिवसांत बँकांचा संपाचा इशारा

बँकांचा ३० मे रोजी संपाचा इशारा

105

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या सर्व सरकारी बँकांमध्ये होणारे कामाचे आऊटसोर्सिंग, शाखा बंद करणे, हंगामी कर्मचाऱ्यांना कायम न करणे, तसेच अयोग्य वेतनकरार या विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी काही बँकांचे कर्मचारी ३० मे रोजी संप करणार आहे. या संबंधित विषयांवर निर्णय प्रक्रियेत द्विपक्षीय पक्षाला बगल देऊन बँक कर्मचारी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचा एक भाग म्हणून सेंट्रल बँकेतील कर्मचारी ३० व ३१ मे रोजी संप करणार आहेत.

या बँकांचे कर्मचारी जाणार संपावर

दरम्यान, बँक ऑफ बडोदा आणि पंजाब अँड सिंध बँक यांचे कर्मचारी ३० मे रोजी संपावर जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बँक ऑफ बडोदामधील सर्व युनियन सफाई कामगारांच्या नोकऱ्या आउटसोर्स करण्याच्या बँकांच्या निर्णयाविरोधात आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचा एक भाग म्हणून बँक ऑफ बडोदाचे कर्मचारी ३० मे रोजी संपावर जाणार आहेत. तर पंजाब आणि सिंध बँकेतील कर्मचारी आउटसोर्सिंगच्या विरोधात आणि पुरेशा भरतीसाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचा एक भाग म्हणून पंजाब आणि सिंध बँकेतील कर्मचारी देखील ३० मे रोजी संपावर जाणार आहेत.

(हेही वाचा – चेक बाऊन्सच्या खटल्यांसाठी आता सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय)

११ व्या द्विपक्षीय कराराची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी कॅथोलिक सीरियन बँकेचे कर्मचारी आधीच आंदोलन करत आहेत. फेडरल बँकेचे कर्मचारी युनियन प्रतिनिधींच्या असंतोषाचा आवाज दाबण्याच्या व्यवस्थापनाच्या प्रयत्नांविरोधात आंदोलन करत आहेत. बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्रमधील कर्मचारी भरतीच्या मागणीसाठी आणि आउटसोर्सिंगला विरोध करत आधीच आंदोलन करत आहेत.

सर्वच बँकांतील कर्मचारी संघटना होणार सहभागी 

युको बँकेच्या कर्मचारी संघटनेने नुकत्याच नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय केंद्रीय समितीच्या बैठकीत नोकरभरतीच्या मुद्द्यावरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. सरकारने त्यांच्या सर्व सामाजिक क्षेत्रातील योजना बँकांमार्फत लागू केल्या असून त्यामुळे कामाचा प्रचंड ताण निर्माण झाला आहे. त्याच वेळी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर सेवानिवृत्ती झाल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर मोठा ताण निर्माण झाला असून त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. जवळपास सर्वच बँकांतील कर्मचारी संघटना या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे सरचिटणीस देविदास तुळजापूरकर यांनी बँकर्स आणि सरकारने युनियनच्या खऱ्या चिंता दूर करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.