Bankimchandra Chattopadhyay : स्वातंत्र्यचळवळीत अनेकांची देशभक्ती जागवणारे वंदे मातरम्‌ कोणी लिहिले माहिती आहे का ?

90
Bankimchandra Chattopadhyay : स्वातंत्र्यचळवळीत अनेकांची देशभक्ती जागवणारे वंदे मातरम्‌ कोणी लिहिले माहिती आहे का ?
Bankimchandra Chattopadhyay : स्वातंत्र्यचळवळीत अनेकांची देशभक्ती जागवणारे वंदे मातरम्‌ कोणी लिहिले माहिती आहे का ?

बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (Bankimchandra Chattopadhyay) हे प्रसिद्ध बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार होते. भारताचं राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ हे गीत त्यांनीच लिहिलेलं आहे. हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या क्रांतिकारकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरलं होतं. रवींद्रनाथ टागोरांच्या (Rabindranath Tagore) आधीच्या बंगाली साहित्यिकांमध्ये ते दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च साहित्यिकांमध्ये गणले जातात. (Bankimchandra Chattopadhyay)

(हेही वाचा- Hotel Fidalgo Goa: गोव्यातील फिदाल्गो हॉटेलजवळील ‘या’ १० गोष्टींबद्दल तुम्हाला माहीत आहे का? वाचा सविस्तर)

बंगाली साहित्याचा उदय आधुनिक युगामध्ये एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात झाला. त्याकाळी राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, प्यारीचंद मित्रा, मायकल मधुसूदन दत्त, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (Bankimchandra Chattopadhyay) आणि रवींद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore) हे प्रमुख साहित्यिक होते. त्याआधीच्या काळात बंगालच्या साहित्यिकांनी बंगाली भाषेऐवजी संस्कृत किंवा इंग्रजीमध्ये लिहिण्याला प्राधान्य दिले. बंगाली भाषेतल्या साहित्यामध्ये जनसामान्यांपर्यंत पोहोचणारे बहुतेक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (Bankimchandra Chattopadhyay) हे पहिले साहित्यिक होते. त्यांची आनंदमठ ही कादंबरी प्रचंड गाजली.

बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (Bankimchandra Chattopadhyay) यांचा जन्म २७ जून १८३८ साली बंगालमधल्या उत्तरी चोवीस परगणा येथील कंथालपाडा जिल्ह्यातील नैहाटी नावाच्या गावात झाला. त्यांचं कुटुंब हे एक पारंपारिक आणि समृद्ध बंगाली कुटुंब होतं. त्यांचं शिक्षण हुगळी कॉलेज आणि प्रेसिडेन्सी कॉलेज येथे झालं. (Bankimchandra Chattopadhyay)

(हेही वाचा- Jagan Mohan Reddy House: आंध्र प्रदेशातील जनतेच्या पैशाचा गैरवापर; डोंगर कापून बांधला 500 कोटींचा राजवाडा! )

१८५७ साली त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजमधून बी.ए. ची पदवी मिळवली. प्रेसिडेन्सी कॉलेजमधून बी.ए. ची पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय होते. त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच त्यांची नियुक्ती डेप्युटी मॅजिस्ट्रेटच्या पदावर झाली. त्यांनी काही काळ बंगाल सरकारचे सचिवपदही सांभाळलं. त्यांना राय बहादूर आणि C.I.E या दोन पदव्या दिल्या गेल्या. (Bankimchandra Chattopadhyay)

१८६९ बंकिंमचंद्र चटोपाध्याय (Bankimchandra Chattopadhyay) यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी सरकारी नोकरी केली आणि १८९१ साली ते निवृत्त झाले. ८ एप्रिल १८९४ साली त्यांचे निधन झाले.  (Bankimchandra Chattopadhyay)

हेही पाहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.