Bank Holidays in March 2023: मार्च महिन्यात १२ दिवस बँका राहणार बंद

164

सध्या फेब्रुवारी महिन्याचा अखेरचा आठवडा सुरू आहे. काही दिवसांत मार्च महिन्याला सुरुवात होईल. येत्या मार्च महिन्यात बँकेशी संबंधित काही महत्त्वाची काम असतील, तर ती लवकर पूर्ण करा. कारण मार्चमध्ये १२ दिवस बँका बंद राहणार आहेत. कारण मार्च महिन्यात होळीसह अनेक सण येत आहेत. तसेच या सणांमध्ये रविवार आणि दुसरा-चौथा शनिवार अशा एकूण सहा साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश आहे. त्यामुळे येत्या मार्च महिन्यात बँकासंबंधित काही काम करण्याचे नियोजन करत असाल तर बँकांच्या सुट्ट्याचे वेळापत्रक जाणून घ्या.

कधी असणार बँका बंद?

  • ३ मार्च, २०२३ – चापचर कुट
  • ५ मार्च, २०२३ – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
  • ७ मार्च, २०२३ – धूलिवंदन / होळी (दुसरा दिवस) / होलिका दहन / धुलंडी / डोल जत्रा
  • ८ मार्च, २०२३ – धुलेती / डोलजात्रा / धुलिवंदन / याओसांग दुसरा दिवस
  • ९ मार्च, २०२३ – होळी (पटना)
  • ११ मार्च, २०२३ – महिन्याचा दुसरा शनिवार
  • १२ मार्च, २०२३ – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
  • १९ मार्च, २०२३ – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
  • २२ मार्च, २०२३ – गुढीपाडवा
  • २५ मार्च, २०२३ – महिन्याचा चौथा शनिवार
  • २६ मार्च, २०२३ – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
  • ३० मार्च, २०२३ – श्रीराम नवमी

नेट बँकिंग सोबत काम करता येईल

बँकांना सुट्ट्या असल्या तरी नेट आणि मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही तुमचे बँकेसंबंधित काम घरी बसून करू शकाल. बँकांमध्ये या सुविधा २४ तास सुरू असतात. मात्र, एटीएममध्ये रोख रकमेची कमतरता भासू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही सुट्टीच्या आधी पैसे काढू घ्या.

(हेही वाचा – खुशखबर! वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे अजय बंगा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.