बार कौन्सिल ऑफ इंडियाकडून न्यायाधीशांचे वय वाढवण्याबाबत ठराव मंजूर

भारतीय बार कौन्सिलच्या गेल्या आठवड्यात झालेल्या संयुक्त बैठकीत एकमताने सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय वाढवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. भारतीय बार कौन्सिलच्या गेल्या आठवड्यात झालेल्या संयुक्त बैठकीत एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला.

(हेही वाचा – वेदांता-फॉक्सकॉनचा संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात; उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मानले आभार, म्हणाले…)

घटनेमध्ये तात्काळ दुरुस्ती करून उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 62 वरून 65 वर्षे करावे आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 67 वर्षे करावे, असे बीसीआयने एका निवेदनात म्हटले होते.

गेल्या आठवड्यात झालेल्या सर्व राज्य बार कौन्सिल, हायकोर्ट बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि बार कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या संयुक्त बैठकीत उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली होती.

दरम्यान, विविध आयोग आणि इतर मंचांचे अध्यक्ष म्हणून अनुभवी वकिलांची नियुक्ती करता यावी यासाठी विविध कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा विचार संसदेकडे करण्याचा प्रस्तावही या संयुक्त बैठकीत ठरविण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here