राज्यातील राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून अनेक गोष्टी घडतांना दिसत आहेत. सरकार आणि विरोधी पक्ष नेते एकमेकांवर टीका करण्याची एकदेखील संधी सोडत नाही आहेत. अशातच सध्या ‘बारसू रिफायनरी’ (Barsu Refinery) प्रकल्पावरून जोरदार राजकारण सुरु झाले आहे. सरकारच्या या प्रकल्पाला विरोधी पक्षाकडून कडाडून विरोध होत आहे.पण आता बारसुतील हे आंदोलन तीव्र झाले असून तीन दिवसांसाठी स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
अशातच मिळालेल्या माहितीनुसार प्रकल्पविरोधी (Barsu Refinery) लढय़ातील मार्गदर्शक सत्यजित चव्हाण यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. “पोलिसांचा फौजफाटा मागे घेऊन दडपशाही थांबवली तरच राज्य सरकारसोबत चर्चा करू” असा इशारा सत्यजित चव्हाण यांनी दिला.
(हेही वाचा –Uday Samant : बारसू प्रकरणावरून मंत्री उदय सामंत यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका)
नेमकं काय म्हणाले सत्यजित चव्हाण?
बारसू प्रकल्पाचे (Barsu Refinery) सुरू असलेले सर्वेक्षण थांबवून, पोलिसांचा फौजफाटा मागे घेऊन दडपशाही थांबवली तरच राज्य सरकारसोबत चर्चा करू, तसेच आमच्या विकासाचे मॉडेल आमच्याच म्हणण्यानुसार चर्चेत मांडले जाईल, सत्यजित चव्हाण यांनी घेतली. शुक्रवार २८ एप्रिल रोजी मुंबईतील प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली ही भूमिका मांडली. यावेळी रिफायनरीविरोधी संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र जोशी आणि अध्यक्ष वैभव कोळवणकर देखील उपस्थित होते.
हेही पहा –
बारसू रिफायनरीला विरोध कायम
“कोकणामध्ये विकास करताना पेट्रोकेमिकल झोन तयार करणारे, मानवासह निसर्गाला हानी (Barsu Refinery) करणारे प्रकल्प नकोत. यासंदर्भात राज्य सरकारला वारंवार निवेदने दिली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, शिंदे यांनी अद्याप भेट दिलेली नाही. एक रिफायनरी प्रकल्प झाल्यास भविष्यात इतर धोकादायक प्रकल्प उभे राहतील. त्यामुळे प्रदूषणात वाढ होईल.” अशा शब्दांत सत्यजित चव्हाण यांनी आपला विरोध दर्शवला आहे.
Join Our WhatsApp Community