मागच्या काही दिवसांपासून इलेक्ट्रीक वाहनांना आग लागण्याचे प्रकार वाढले आहेत. या आग लागण्याच्या प्रकरणांची फाॅरेन्सिक तपासणी करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. इलेक्ट्रीक गाड्यांना आग का लागते? याचे एक कारण समोर आले आहे. विदेशी बॅट-यांमुळे ई-वाहनांना आग लागत असल्याचा संशय नीती आयोगाच्या सदस्याने व्यक्त केला आहे.
विदेशातून आयात केले जाणारे बॅटरी सेल भारतातील वातावरणासाठी योग्य नाहीत, त्यामुळेच ईलेक्ट्रिक वाहने अचानक पेटण्याच्या घटना घडत असाव्यात, असा संशय नीती आयोगाचे सदस्य व शास्त्रज्ञ व्ही.के.सारस्वत यांनी व्यक्त केला आहे. ईलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी सेलचे उत्पादन भारतातच व्हायला हवे, असा आग्रहही त्यांनी धरला आहे.
स्वदेशी बॅटरीचे उत्पादन व्हावे
अशा वाहनांना आग लागण्याच्या अनेक घटना अलीकडे घडल्या. महाराष्ट्र आणि तेलंगणा येथे इलेक्ट्रीक वाहनांना आग लागल्याचे समोर आले होते. आता तेलंगणामध्येही इलेक्ट्रिक वाहनाने पेट घेतली. याची दखल घेत सरकारने चौकशी करण्याचे आदेश दिले. एका मुलाखतीत सांगितले की, याक्षणी भारत बॅट-यांचे उत्पादन करीत नाही. विदेशी बॅटरी सेल भारतातील तापमानासाठी योग्य नसावेत. देशाने स्वत: चे सेल उत्पादन प्रकल्प उभारायला सांगितले. उत्पादित होणारे सेल हे भारतातील उच्च तापमानात टिकून राहतील, याची खात्री आपण करायला हवी.
( हेही वाचा: महागाईचा आलेख वाढता, महागाई उच्चांक गाठणार रॉयटर्सचा निष्कर्ष )
तेलंगणामध्ये पुन्हा इलेक्ट्रिक वाहनाला आग
इलेक्ट्रिक वाहनाच्या बॅटरीला आग लागून स्फोट झाल्याची घटना तेलंगणामध्ये घडली आहे. यात कोणीही जखमी झालेले नाही. इलेक्ट्रिक स्कूटरला चार्जिंग सुरु असतानाच, बॅटरीचा स्फोट झाला. यात गाडीचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याचे सत्र सुरु आहे. सध्या या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
Join Our WhatsApp Community