महान क्रांतीकारक (Revolutionary) बटुकेश्वर दत्त यांची नुकतीच १८ नोव्हेंबर या दिवशी झाली. त्या निमित्ताने रवींद्र सासमकर यांनी वाहिलेली श्रद्धांजली !
भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त (Batukeshwar Dutt) यांनी नॅशनल असेम्बलीमध्ये बाॅम्ब टाकला होता. तेव्हा ‘बटुकेश्वर दत्त’ हे नाव सर्वतोमुखी झाले. भगतसिंह (Bhagat Singh), राजगुरु (Rajguru), सुखदेव (Sukhdev) यांना फाशी झाली आणि बटुकेश्वर दत्त यांना अंदमानला (Andaman) काळ्या पाण्याची शिक्षा झाली. तेथील यातनामय शिक्षेने त्यांना क्षयरोगाची बाधा झाली, परंतु ते वाचले. नंतरही अन्यत्र त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.
(हेही वाचा – Foreign exchange reserves : भारताकडे जगातील चौथ्या क्रमांकाचा परकीय चलन साठा; किती कोटींची वाढ झाली?)
उदरनिर्वाहासाठी गोळ्या-बिस्किटे विकण्याची वेळ
१९४७ साली भारत स्वतंत्र झाला, तेव्हा बटुकेश्वर दत्त (Batukeshwar Dutt) यांची सुटका झाली. अंजली नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला. बटुकेश्वर दत्त यांच्यापुढे आता पोटाचा प्रश्न उभा राहिला. स्वातंत्र्यासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या बटुकेश्वर दत्त यांना दोन वेळच्या जेवणासाठी गोळ्या-बिस्किटे विकावी लागली.
स्वतंत्र भारतात लाचाराप्रमाणे सरकारी कार्यालयात खेटे
एकदा त्यांना कळले की, पटना येथे बस चालवण्यासाठी लायसन्स मिळत आहे. त्यासाठी ते कमिश्नरला भेटले; परंतु त्यांना ‘स्वतंत्र भारतात स्वातंत्र्यसैनिक’ असल्याचे प्रमाणपत्र मागण्यात आले. काय वाटले असेल या क्रांतिकारकाला ? ज्याला ब्रिटीश सरकार भयभीत व्हायचे, ज्याने स्वतंत्र भारतासाठी सर्वस्व अर्पण केले, तो आता स्वतंत्र भारतात लाचाराप्रमाणे सरकारी कार्यालयात खेटे घालत होता.
(हेही वाचा – Thane Fire : दोन मजली घराला आग, दोन जणांचा मृत्यू)
आजारपणातही अवहेलना
१९६४ मध्ये ते आजारी पडले, तेव्हा त्यांना सरकारी दवाखान्यात भरती केले गेले, त्यांची अवस्था पाहून त्यांचे मित्र चमनलाल आजाद यांनी लिहिले होते, “बटुकेश्वर दत्तसारख्या क्रांतिकारकांनी भारतात जन्म घ्यावा का ? परमेश्वराने त्यांना या देशात जन्माला घालून फार मोठी चूक केली आहे. ज्या व्यक्तीने देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची बाजी लावली, तो दवाखान्यात तळमळत आहे. विचारणारासुद्धा कोणी नाही ??”
हा लेख प्रसिद्ध झाला, तेव्हा सरकारला जाग आली; पण वेळ निघून गेली होती. त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. शेवटी त्यांना भारतीय आयुर्विज्ञान संस्थानमध्ये (एम्स) दाखल करण्यात आले. तेथील डाॅक्टरांनी सांगितले की, आधी पैसे भरा. लोक म्हणाले, “अहो, हे महान क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त (Batukeshwar Dutt) आहेत.” तरीही डाॅक्टर म्हणाले, “आम्ही नाही ओळखत, आधी पैसे भरा.” या क्रांतिकारकाचे मन नक्कीच म्हणाले असेल, “जर मी भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेवसोबत फासावर गेलो असतो, तर मला हा दिवस पहावा लागला नसता.”
(हेही वाचा – Chandrashekhar Bawankule : लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळतील 340 पेक्षा अधिक जागा)
अंत्यसंस्कार भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांच्या समाधीजवळ
२० जुलै १९६५ रोजी त्यांचे दिल्ली येथे निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचा अंत्यसंस्कार हुसैनीवाला येथे भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांच्या समाधीजवळ करण्यात आला. भगतसिंहाच्या आई विद्यावतीदेवी त्यांना भेटायला आल्या होत्या. त्या बटुकेश्वर दत्तांना ‘भगतसिंहच’ मानत असत.
हजारो क्रांतिकारकांची जिवंतपणी आणि मेल्यानंतरही उपेक्षा
स्वतंत्र भारतात अशा हजारो क्रांतिकारकांची (Freedom Fighters) आम्ही उपेक्षा केली. सावरकरांसारख्या क्रांतीकारकाची, तर मेल्यानंतरही उपेक्षा केली. आज ज्यांची गीते भारतातल्या तरुणांच्या ओठावर असले पाहिजे, त्यांना आम्ही विसरलो आहोत.
(हेही वाचा – Foreign exchange reserves : भारताकडे जगातील चौथ्या क्रमांकाचा परकीय चलन साठा; किती कोटींची वाढ झाली?)
आक्रमकांच्या जयंतीसाठी सरकारी खर्च; क्रांतिकारकांच्या समाधीकडे दुर्लक्ष
टिपु सुलतानसारख्या (Tipu Sultan) अत्याचारी लोकांच्या जयंती सरकारी खर्चाने साजऱ्या झाल्या. मातृभूमीसाठी समर्पण करणाऱ्या क्रांतिकारकांच्या समाधीवर ‘ना दीप जलते है, ना फुल चढते है’ अशी अवस्था आहे. क्रांतिकारी रामप्रसाद यांनी लिहिले होते,
कभी वह दिन भी आयेगा,
की आझाद हम होंगे l
अपनी ही जमी होगी l
अपना आसमाॅं होगा
शहिदो की चिताओ पर लगेंगे हर बरस मेले
वतन पर मरमिटनोवाला यही निशाँ होगा ll
या क्रांतिकारकांना काय माहीत होते की, ज्यांच्यासाठी आपण फासावर जात आहोत, ते आपली आठवणही काढणार नाहीत. तेच लोक आपल्याला विसरून जातील. पंडीत नेहरु जेव्हा म्हणाले की, ‘आम्ही रक्ताशिवाय स्वातंत्र्य मिळवले’, तेव्हा या लोकांच्या आत्म्याला किती वेदना झाल्या असतील ? हे स्वातंत्र्य आम्हाला ‘बिना खड्ग बिना ढाल’ मिळाले नाही. हजारो क्रांतिकारकांना त्यासाठी फासावर जावे लागले आहे. (Batukeshwar Dutt)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community